एफबीआयचे संचालक क्रिस्टोफर रे यांनी मंगळवारी (12 डिसेंबर) एनआयएच्या मुख्यालयाला भेट दिली, जिथे त्यांनी दहशतवादविरोधी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीचे महासंचालक दिनकर गुप्ता यांची भेट घेतली आणि दहशतवादी संघटित गुन्हेगारी नेटवर्कच्या कृत्यांशी संबंधित मुद्यांवर चर्चा केली.( Attack On Indian Consulate)
खलिस्तानी दहशतवाद्याला ठार मारण्याचा कट रचल्याचा अमेरिकेने केलेल्या आरोपदरम्यान क्रिस्टोफर रे हे भारत दौऱ्यावर आले आहे. भारतीय दूतावासावरील हल्ल्याची अमेरिका आक्रमकपणे तपास करत असल्याचेही त्यांनी सांगितले. लवकरच ठोस माहितीही मिळेल असेही त्यांनी सांगितले. ( Attack On Indian Consulate)
(हेही वाचा : Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षक संघटना बेमुदत संपावर)
एन. आय. ए. आणि एफ. बी. आय. यांच्यातील सहकार्य कायम ठेवण्याचा स्पष्ट इशारा देताना क्रिस्टोफर ए. रे यांनी गुप्ता यांना सांगितले की, एफ. बी. आय. यावर्षी १९ मार्च आणि २ जुलै रोजी सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासावरील हल्ल्याचा आक्रमकपणे तपास करत आहे. याप्रकरणी लवकरच महत्वाची माहिती मिळू शकेल असा दावाही त्यांनी केल आहे. रे यांनी नंतर जयसिंग रोड येथील दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) मुख्यालयाला भेट दिली. आणि पोलीस आयुक्त अरोरा आणि इतर वरिष्ठ आधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. तर दहशतवाद, सायबर फसवणूक आणि बनावट कॉल सेंटर संदर्भात यावेळी चौकशी करण्यात आली.
(हेही वाचा : Suryakumar Yadav : सुर्यकुमारच्या नावावर टी-२० क्रिकेटमधला ‘हा’ विक्रम )
हेही पहा –