ऋजुता लुकतुके
१९९८मध्ये स्थापन झालेल्या गुगल या टेक कंपनीने यंदा २५ वर्षं पूर्ण केली आहेत. आणि त्या निमित्ताने कंपनीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. यात गुगल सर्च इंजिनवर (Virat Kohli) सगळ्यात जास्त वेळा सर्च झालेल्या व्यक्ती आणि घटनांचा उल्लेख आहे. यात क्रिकेटमध्ये आघाडीवर आहे तो विराट कोहली.
विराट कोहली पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर सगळ्यांसमोर आला तो २००८ मध्ये. आणि भारताच्या १९ वर्षांखालील संघाचं नेतृत्व करताना त्याने संघाला विश्वचषकही मिळवून दिला होता. तेव्हापासून आजतागायत विराटने क्रिकेटच्या मैदानावर नवनवीन विक्रम रचले आहेत. यातला सगळ्यात अलीकडचा विक्रम आहे तो सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात जास्त शतकांचा विक्रम. सचिनच्या ४९ शतकांचा विक्रम मागे टाकून विराटने आता ५० वं शतक विश्वचषकादरम्यान झळकावलं आहे.
If the last 25 years have taught us anything, the next 25 will change everything. Here’s to the most searched moments of all time. #YearInSearch pic.twitter.com/MdrXC4ILtr
— Google (@Google) December 11, 2023
गुगलच्या या व्हीडिओत एकमेव भारतीय नाव आहे ते विराट कोहलीचं. महेंद्रसिंग धोणीनंतर विराट कोहलीने भारतीय संघाची नेतृत्वाची धुराही वाहिली होती. दोनच वर्षांपूर्वी विराटने कर्णधारपद सोडलं. पण, विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशातील विजयांत सातत्य मिळवलं. आणि पहिल्यांदा कसोटी विश्वविजेतेपदाची अंतिम फेरी गाठली.
आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाचा (Virat Kohli) तो आयकॉन खेळाडू आहे. आणि अलीकडेच झालेल्या विश्वचषक स्पर्धेत ३ शतकं आणि ५ अर्धशतकांसह त्याने सर्वाधिक ७६५ धावा करून तो मालिकावीर ठरला होता. एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावावर केला आहे. सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात तो एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत खेळत नाहीए. आणि २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत तो संघात परतणार आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community