Ind vs SA ODI : बुमरा आणि राहुल यांचा एकदिवसीय मालिकेसाठी सराव सुरू

टी-२० मालिकेनंतर होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय खेळाडू सध्या मुंबईत तयारी करत आहेत.

202
Ind vs SA ODI : बुमरा आणि राहुल यांचा एकदिवसीय मालिकेसाठी सराव सुरू
Ind vs SA ODI : बुमरा आणि राहुल यांचा एकदिवसीय मालिकेसाठी सराव सुरू
  • ऋजुता लुकतुके

टी-२० मालिकेनंतर होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय खेळाडू सध्या मुंबईत तयारी करत आहेत. तेव्हाचा एक व्हिडिओ के एल राहुलने शेअर केला आहे. (Ind vs SA ODI)

भारतीय संघाची दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिका १७ डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि या संघाचं नेतृत्व करणार आहे के एल राहुल. राहुल आणि इतर खेळाडू या खडतर दौऱ्यासाठी सध्या भारतातच आपापल्या गावी सराव करत आहेत. (Ind vs SA ODI)

सरावा दरम्यान जसप्रीत बुमरा आणि के एल राहुल यांचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. खुद्द राहुलनेच हा व्हिडिओ शेअर केला आहे. के एल राहुल आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिकेत यष्टीरक्षणाचीही भूमिका बजावणार आहे. (Ind vs SA ODI)

राहुलने या व्हिडिओला कॅप्शन दिलं आहे, ‘काहीतरी नवीन करत आहे, तुम्हाला आवडलं तर नक्की सांगा.’ आता राहुल इथं सरावाबद्दल बोलतोय की, सरावाच्या व्हिडिओबद्दल हे मात्र त्याने स्पष्ट केलेलं नाही. (Ind vs SA ODI)

 

View this post on Instagram

 

A post shared by KL Rahul👑 (@klrahul)

(हेही वाचा – NIA Raid : एनआयएची बंगळुरू मध्ये छापेमारी; दहशतवादी कट रचला जात असल्याचा संशय)

राहुलबरोबर या सराव सत्रात तेज गोलंदाज जसप्रीत बुमरानेही भाग घेतला. दोघांनी तंदुरुस्तीसाठी व्यायाम केला आणि यात वातावरण हलकं फुलकं ठेवण्यासाठी विनोदही केला. ‘मी आता धावण्याच्या व्यायामाने सरावाची सुरुवात करत आहे. फलंदाजी आणि धावणं असं आजच्या सरावाचं स्वरुप आहे. आमचा दिवस मोठा आहे आणि नेहमीप्रमाणे बुमरा तक्रार करणार आहे की, गोलंदाजांचा सराव फलंदाजां पेक्षा कठीण असतो,’ असं राहुल म्हणाला. (Ind vs SA ODI)

त्यानंतर बुमरा खरंच राहुलला म्हणतोय, ‘तुझं काम सोपं आहे. फक्त बॅटमागे लपायचं.’ (Ind vs SA ODI)

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानची एकदिवसीय मालिका १७ डिसेंबरपासून सुरू होतेय. पहिला सामना जोहानसबर्ग इथं तर पुढील सामने एका दिवसाच्या फरकाने गेबेखा आणि पार्ल इथं होणार आहेत. (Ind vs SA ODI)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.