संसदेत लोकसभेचं खासदारांची आसन व्यवस्था असलेल्या ठिकाणी खासदारांचं संबोधन सुरू असताना ३ अज्ञात व्यक्ती थेट आत शिरल्या. प्रेक्षक गॅलरीतून एका व्यक्तिने उडी मारून ती लोकसभेचं कामकाज सुरू असलेल्या ठिकाणी शिरली. यावेळी त्यांनी संसदेबाहेर स्मोक कँडल जाळल्या आणि घोषणाही दिल्या जात होत्या. यामुळे पिवळ्या रंगाचा धूर त्यातून येत होता. संसदेच्या आवारातही त्यांनी या स्मोक कँडल जाळल्यामुळे परिसरातही हा धूर पसरला.
आजच संसदेवरील हल्ल्याला २२ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम पार पडला. आजच्या दिवशी घटना घडली. यामुळे लोकसभेच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे लोकसभेचं कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.
(हेही वाचा – NIA Raid : एनआयएची बंगळुरू मध्ये छापेमारी; दहशतवादी कट रचला जात असल्याचा संशय )
लोकसभेत शिरलेल्या या अज्ञात व्यक्तिंना खासदारांनी घेरल्यामुळे दोघांना पकडण्यात आलं आहे. यापैकी अमोल शिंदे, सागर आणि नीलम सिंग या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. नव्या संसद भवनातून सुरक्षा भेदून हे तिघेही आत कसे शिरले, त्यांना पासेस कोणी दिले याबाबत प्रश्नचिन्ह व्यक्त होत आहे.
Join Our WhatsApp Community