- ऋजुता लुकतुके
फ्रेंच ओपन जिंकलेल्या इगाने (Iga Swiatek) अलीकडेच डब्ल्यूटीए हंगामातील अंतिम स्पर्धाही जिंकली आहे. (Iga Swiatek Player of the Year)
इगा स्वितेक (Iga Swiatek) सध्याची महिलांमधील अव्वल खेळाडू आहे आणि तिने सलग दुसऱ्यांदा टेनिसमध्ये महिला टेनिस संघटनेचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडू होण्याचा मान पटकावला आहे. यावर्षी तिने चांगली कामगिरी करताना फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकली. तिच्या ग्रँडस्लॅम विजेतेपदांची संख्या त्यामुळे ४ वर गेली आहे. त्याचबरोबर तिने डब्ल्यूटीए अंतिम स्पर्धाही नुकतीच जिंकली आहे. (Iga Swiatek Player of the Year)
वर्षभरात फक्त काही आठवड्यांचा अपवाद वगळता तीच अव्वल स्थानावर होती. (Iga Swiatek Player of the Year)
2023 Player of the Year 👏
World No.1 @iga_swiatek has been voted as the WTA Player of the Year for the second year in a row! Winning a tour-leading six titles. pic.twitter.com/KNCaRXqkrM
— wta (@WTA) December 11, 2023
२२ वर्षांच्या या पोलिश खेळाडूने या हंगामात सहा विजेतेपदं पटकावली आहेत. तर दोनदा सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकावणारी सेरेना विल्यम्स नंतरची ती फक्त दुसरी महिला टेनिसपटू आहे. यापूर्वी सेरेनाने २०१२ आणि २०१५ मध्ये हा पुरस्कार पटकावला होता. (Iga Swiatek Player of the Year)
2023 Most Improved Player of the Year 👏
Zheng Qinwen won two Hologic WTA titles this year, reached another career milestone with a quarterfinal run at the US Open and achieved a new career-high ranking of No.15! pic.twitter.com/u2Z5Xxzjlh
— wta (@WTA) December 11, 2023
(हेही वाचा – Republic Day 2024 Guest : प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमाचे पाहुणे कोण असणार ? जो बायडेन यांनी व्यक्त केली असमर्थता)
डब्ल्यूटीएच्या इतर महत्त्वाच्या पुरस्कारांमध्ये झेंग किनवेन कामगिरीत सुधारणा करण्यासाठी गौरवली गेली. तर एलिना स्वितोलिना सर्वोत्तम पुनरागमन करणारी खेळाडू ठरली आहे. स्वितोलिना यावर्षी फ्रेंच ओपनच्या उपउपांत्य फेरीत पोहोचली होती. तर विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत तिने मजल मारली होती. (Iga Swiatek Player of the Year)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community