भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) कार्यक्रमासाठी दरवर्षी विविध देशांतील मान्यवरांना निमंत्रण दिले जाते. यंदाच्या कार्यक्रमासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांना भारत सरकारच्या वतीने निमंत्रण देण्यात आले होते. (Republic Day 2024 Guest) या कार्यक्रमाला येण्यास बायडेन यांनी असमर्थता व्यक्त केली आहे. ते प्रजासत्ताक दिन 2024 साठी भारतात येणार नाहीत. अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी (Eric Garcetti) यांनी याविषयी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते.
(हेही वाचा – Ind vs SA ODI : बुमरा आणि राहुल यांचा एकदिवसीय मालिकेसाठी सराव सुरू)
जानेवारी महिन्याच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीस अमेरिकेत संसदेच्या (Parliament in America) दोन्ही सभागृहात राष्ट्राध्यक्षांना ‘अमेरिकेची सध्यस्थिती’ यावर वार्षिक संदेश द्यावा लागतो. त्याच्या तयारीसाठी जो बायडेन (Joe Biden) यांना वेळ हवा आहे.
यावेळी भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमंत्रणावर अमेरिकेने अद्याप काहीही सांगितले नव्हते. आता त्या विषयी खुलासा करण्यात आला आहे. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांनी वर्ष 2015 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहिले होते. आपल्या 3 दिवसांच्या दौऱ्यात ओबामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासोबत ‘मन की बात’ कार्यक्रमातही भाग घेतला. (Republic Day 2024 Guest)
क्वाड देशांची बैठक पुढे जाणार
जो बायडेन यांच्या वेळेची उपलब्धता नसल्यामुळे क्वाड सदस्य देशांची (Quad Member Countries) बैठकही लांबणार आहे. 26 जानेवारी रोजी क्वाड सदस्य देश ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय दिवसदेखील आहे. यामुळे अँथनी अल्बानीज त्या वेळी क्वाड सभेला उपस्थित राहू शकत नाहीत. आता जपानचे पंतप्रधान फुमिया किशिदा भारतात येण्याची फारशी आशा नाही.
2023 मध्येही बदलला होता दिनांक
2023 या वर्षीची क्वाड बैठक (Quad Meeting) जपानच्या हिरोशिमा (Hiroshima) शहरात झाली. यापूर्वी ही बैठक ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे होणार होती. मात्र, त्यावेळी अमेरिकेतील कर्जाच्या संकटामुळे ती बायडेन यांच्या विनंतीवरून पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर जी-7 देशांच्या बैठकीचे नियोजन करण्यात आले. (Republic Day 2024 Guest)
Join Our WhatsApp Community