Shaktikanta Das @5 : शक्तिकांत दास यांची रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून ५ वर्षं पूर्ण

बेरोजगारी आणि महागाई हे फक्त भारतासमोरचेच नाही तर जगभरातील मोठे शत्रू आहेत.

154
Interest Rates in India : व्याजदर कमी करण्यावर रिझर्व्ह बँक गव्हर्नर नेमकं काय म्हणाले?
  • ऋजुता लुकतुके

इतिहास विषयातील पदवी घेऊन रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर झाले म्हणून झालेली हेटाळणी, ते कोव्हिड नंतर महागाईच्या समस्येशी दिलेला लढा, शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांच्यासाठी ही पाच वर्षं नक्कीच सोपी नव्हती. (Shaktikanta Das @5)

शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. पण, ही पाच वर्षं जगभरातील कुठल्याही मध्यवर्ती बँकेसाठी सोपी नव्हती. बेरोजगारी आणि महागाई हे फक्त भारतासमोरचेच नाही तर जगभरातील मोठे शत्रू आहेत. त्यामुळे शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांचा हा कार्यकाळही खूप मोठ्या आव्हानांचा होता. (Shaktikanta Das @5)

या पाच वर्षांत कोव्हिड उद्रेकामुळे जग थांबलेलं आपण पाहिलं, अमेरिकेतील बँकांच्या मंदीचा जगभरात झालेला परिणाम पाहिला आणि दोन मोठी युद्ध, जी अजून सुरू आहेत, पाहिली. या घटनांचा जागतिक अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम झाला आहे आणि भारताही याला अपवाद नाही. अशावेळी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून दास यांच्यासमोर कुठली आव्हानं होती, त्यांचा त्यांनी कसा मुकाबला केला आणि पुढे काय वाढून ठेवलं आहे यावर एक नजर टाकूया… (Shaktikanta Das @5)

मध्यवर्ती बँक आणि केंद्र सरकार यांच्यातील संबंध

शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांच्या कार्यकालात रिझर्व्ह बँक आणि सरकार यांचे संबंध सुधारले. यापूर्वी रघुराम राजन आणि उर्जित पटेल यांनी रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेचा उल्लेख करून सरकराचा रोष ओढवून घेतला होता. याउलट दास यांनी अनेकदा खाली मान घालून काम करणं पसंत केलं. (Shaktikanta Das @5)

आपले सहकारी, मीडिया आणि केंद्र सरकार (Central Govt) यांच्याशी चांगले संबंध राखत दास यांनी सगळ्यांमध्ये संवाद राहील याची दक्षता घेतली. (Shaktikanta Das @5)

दास २०१६ पासूनच केंद्र सरकारच्या विश्वासातील अधिकारी होते. तेव्हा प्रशासकीय अधिकारी म्हणून नोटबंदीची अख्खी प्रक्रिया त्यांनी पार पाडली होती. तो निर्णय तेव्हाचे गव्हर्नर रघुराम राजन यांना फारसा पटला नव्हता. त्यामुळे ते नोटबंदी राबवताना मागेच राहिले. अशावेळी दास यांनी पुढाकार घेऊन ही प्रक्रिया पार पाडली होती. तेव्हापासून ते सरकारचे विश्वासू म्हणूनच ओळखले जात होते. (Shaktikanta Das @5)

कोव्हिड उद्रेक आणि आर्थिक रणनीती

कोव्हिड उद्रेकानंतर उद्भवलेली आर्थिक मंदी ही जगासमोरची सगळ्यात मोठी समस्या होती. अशावेळी दास यांनी सरकारची आर्थिक बाजू मजबूत सांभाळली. अर्थव्यवस्थेत रोखता राहील याची काळजी घेण्याबरोबरच आर्थिक संकटात असलेल्या समाज घटकांना मदत करण्याचा भार रिझर्व्ह बँकेनं पेलला. कर्जावरील मोरेटोरिअम असेल किंवा सहा महिन्यांसाठी कर्ज उपलब्ध करून देणं या योजना त्यांनी राबवल्या. (Shaktikanta Das @5)

याच कामगिरीमुळे २०२१ साली केंद्र सरकारने त्यांना ३ वर्षांची मुदतवाढ दिली. पण, दास यांच्यासमोरची काही आव्हानं अजून संपलेली नाहीत. (Shaktikanta Das @5)

(हेही वाचा – Iga Swiatek Player of the Year : इगा स्वितेक सलग दुसऱ्यांदा डबल्यूटीएची सर्वोत्तम खेळाडू )

महागाई विरोधातील लढा अजून संपलेला नाही

आता शक्तिकांत दास (Shaktikanta Das) आणि रिझर्व्ह बँकेसमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो महागाई दराचा. कोव्हिड नंतर महागाई दर आटोक्यात आणणं अजून भारताला जमलेलं नाही. तसं अख्ख्या जगासमोरचीच ही समस्या आहे. पण, भारतात अनियमित पावसाने शेतकऱ्यांचा जीव आणखी हैराण केला आहे आणि कृषि उत्पादनही धटलंय. त्यामुळे भारतातील ही समस्या थोडी वेगळी आहे. (Shaktikanta Das @5)

गेले दोन महिने महागाई दर थोडा खाली म्हणजे ५.५ टक्क्यांवर आला आहे. तर तो सातत्याने ४ ते ६ टक्के या रिझर्व्ह बँकेनंच ठरवलेल्या मर्यादेत ठेवणं हे मोठं आव्हान आहे. अन्नधान्याच्या किमतींमुळे महागाई वाढते तेव्हा ती जास्त धोकादायक आणि आवरायला कठीण असते. भारतात याला इंधनाच्या किमतीचीही जोड आहे. कारण, आपण ८० टक्के इंधन आयात करतो. अशावेळी महागाईचं संकट वेळीच ओळखून त्यावर उपाययोजना करणं ही आता रिझर्व्ह बँकेची प्राथमिकता असणार आहे. (Shaktikanta Das @5)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.