संसदेवरील आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांचे स्मरण करत असतांनाच १३ डिसेंबर रोजी संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघाले. लोकसभेत शून्य प्रहर सुरु असतांना २ तरुणांनी दर्शक गॅलरीतून थेट सभागृहात उडी मारून हंगामा केला. संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेत एवढी मोठी चूक पहिल्यांदाच बघायला मिळाली आहे. (Lok Sabha Intrusion)
संसदेचे हिवाळी अधिवेशन (Parliament Winter Session) सुरू आहे. २२ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी अर्थात १३ डिसेंबर रोजी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला चढवला होता. पोलिसांनी हा हल्ला परतवून लावण्यात यश मिळविले. मात्र या हल्ल्यात सहा दिल्ली पोलिस कर्मचारी, दोन संसद सुरक्षा कर्मचारी आणि एक माळी यांना वीर मरण आले. आज संसदेच्या आवारात सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. (Lok Sabha Intrusion)
यानंतर लोकसभेच्या कामकाजला सुरुवात झाली. शून्य प्रहराचे कामकाज सुरु असतानाच एका अज्ञात व्यक्तीने व्हिजिटर गॅलरीतून सभागृहात उडी मारली. यामुळे सभागृहत एकच खळबळ उडाली. सभागृहात प्रचंड गदारोळ होऊन कामकाज तहकूब करण्यात आले. (Lok Sabha Intrusion)
ताबडतोब नियंत्रण मिळवले
पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी नंतर प्रसारमाध्यमांना सांगितले की, जेव्हा एका व्यक्तीने गॅलरीतून उडी मारली, तेव्हा तो खाली पडला असावा, असे वाटत होते. त्यानंतर आणखी एक व्यक्ती प्रेक्षक गॅलरीतून उडी मारताना दिसली. त्यापैकी एकाच्या हातात काहीतरी होते, ज्यातून पिवळा धूर निघत होता, तर दुसर्याच्या हातात काहीतरी होते ज्याचा आवाज येत होता. ते कोणतेही नुकसान करू शकले नाहीत. त्यांच्यावर ताबडतोब नियंत्रण मिळवले गेले. मात्र, प्रेक्षक गॅलरीतून त्याची उडी ही गंभीर बाब आहे. संसदेच्या सुरक्षेतील ही मोठी चूक आहे. चौकशी करून कारवाई केली जाईल. (Lok Sabha Intrusion)
(हेही वाचा – MSEB : महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कर्मचाऱ्यांची ‘पेंशन’ची प्रतीक्षा संपेना; सरकारची नकारघंटा थांबेना)
सुरक्षा राखण्यात अपयशी ठरलो ?
लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले, ”आजच आम्ही आमच्या शूर जवानांना पुष्पांजली अर्पण केली ज्यांनी संसदेवरील हल्ल्यात बलीदान दिले आणि आजच सभागृहात हल्ला झाला. यावरून हे सिद्ध होते की, आम्ही उच्च पातळीची सुरक्षा राखण्यात अपयशी ठरतो ? सर्व खासदारांनी बेधडकपणे या दोघांना पकडले, पण मला जाणून घ्यायचे आहे की, हे सर्व घडले तेव्हा सुरक्षा अधिकारी कुठे होते ?” (Lok Sabha Intrusion)
घटनेची सखोल चौकशी
लोकसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले आहे. सभागृहातील सुरक्षेतील त्रुटींबाबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, ‘शून्य तासात घडलेल्या घटनेची लोकसभा आपल्या स्तरावर सखोल चौकशी करत आहे. या संदर्भात दिल्ली पोलिसांना आवश्यक सूचनाही देण्यात आल्या आहेत. प्राथमिक तपासणीनुसार हा फक्त सामान्य धूर होता, त्यामुळे हा धूर चिंतेचा विषय नाही.” (Lok Sabha Intrusion)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community