- ऋजुता लुकतुके
कंपनीने २०५० पर्यंत आपल्या कंपन्यांमध्ये शून्य कार्बन उत्सर्जनाचं उद्दिष्टं ठेवलं आहे.(Adani Green Energy)
गौतम अदानींचा अदानी उद्योग समुह येत्या १० वर्षांत हरित ऊर्जा क्षेत्रात १०० अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करणार आहे. आणि या गुंतवणुकीची सुरुवात कंपनी आपल्या समुहातील सिमेंट, पोर्ट, हरित ऊर्जा, हरित ऊर्जा सोल्युशन्स या कंपन्यांनी करणार आहे. अदानी समुहातील कंपन्यांसमोर २०५० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. आणि त्यासाठीची ही गुंतवणूक असेल.(Adani Green Energy)
अदानी समुहातील या पाच कंपन्यांनी आपल्या कामकाजात जास्तीत जास्त हरित ऊर्जा कशी वापरता येईल, टाकाऊ पदार्थांचं रिसायकलिंग कसं करता येईल, उत्पादन प्रक्रियेत वापरली जाणारी जास्तीत जास्त ऊर्जा पर्यावरणपूरक स्त्रोतातून कशी मिळवता येईल, याचा विचार सुरू केला असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.(Adani Green Energy)
Adani will invest $100 billion in green energy transition over the next decade across its ports, power and cement operations https://t.co/0T30onLrzq
— Bloomberg (@business) December 13, 2023
(हेही वाचा – Lok Sabha Intrusion : संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक)
‘शून्य कार्बन उत्सर्जनाच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी हरित हायड्रोजन हा एक पर्याय कंपनीला दिसतो आहे. पर्यावरणपूरक या इंधनाचा अधिकाधिक वापर अदानी समुहाच्या कंपन्यांमध्ये शक्य व्हावा यासाठी योग्य वातावरण आणि तशा सुविधा तयार करण्याचं काम येत्या वर्षांमध्ये करण्यात येईल. आणि त्यासाठी अदानी समुह येत्या १० वर्षांत १०० अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करणार आहे. याचा फायदा समाजालाही होईल. कारण, हरित हायड्रोजन इंधनाचा वापर आर्थिक दृष्ट्या किफायतशीर करावा असा कंपनीचा इरादा असेल,’ असं कंपनीने आपल्या पत्रकात म्हटलं आहे.(Adani Green Energy)
या उपायांबरोबरच अदानी समुह २०३० पर्यंत देशभरात १० कोटी झाडं लावणार आहे.(Adani Green Energy)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community