Bangladeshi Infiltrators : २० हजार रुपयांत बांगलादेशी बनले भारतीय; गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक माहिती उघड

Bangladeshi Infiltrators : घुसखोर बांगलादेशींचे भारतीय असल्याचे बनावट पुरावे तयार करून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत त्यांची रहाण्याची सोय केली जात होती, अशी माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या चौकशीत समोर आली आहे.

230
Bangladeshi Infiltrators : २० हजार रुपयांत बांगलादेशी बनले भारतीय; गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक माहिती उघड
Bangladeshi Infiltrators : २० हजार रुपयांत बांगलादेशी बनले भारतीय; गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक माहिती उघड

बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीररित्या भारतात आणून त्यांना २० हजार रुपयांमध्ये भारतीय बनवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घुसखोर बांगलादेशींचे (Bangladeshi Infiltrators) भारतीय असल्याचे बनावट पुरावे तयार करून मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) आणि नवी मुंबईत (Navi Mumbai) त्यांची रहाण्याची सोय केली जात होती, अशीही माहिती मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) अटक केलेल्या एजंटच्या चौकशीत समोर आली आहे.

(हेही वाचा – Blood Bank : राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात रक्तपेढी उभारणार; तानाजी सावंत यांची घोषणा)

स्वतः घुसखोरी करून इतरांनाही आणले

मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ६ च्या पथकाने काही दिवसांपूर्वी शिवडी (Sewri) येथून अक्रम नूरनबी शेख (वय २६ वर्षे), सह २ बांगलादेशी एजंटना (Bangladeshi Agent) अटक केली होती. या दोघांच्या चौकशीत त्यांनी धक्कादायक माहिती पोलिसांना दिली. हे दोघे मूळचे बंगालदेशी आहेत. काही वर्षांपूर्वी तो बेकायदेशीररित्या घुसखोरी करून भारतात आला होता. शिवडीतील बरकतअली नाका या ठिकाणी तो भाडेतत्त्वावर रहात होता. आता तो इतर बांगलादेशींना भारतात आणून अवैधरित्या स्थायिक करत आहे. (Bangladeshi Infiltrators)

बोगस आधारकार्ड बनवण्यास साहाय्य

बांगलादेशातून भारतात येण्यास इच्छुक असणाऱ्याकडून अक्रम आणि त्याचा सहकारी २० हजार रुपये घेत असत. त्यानंतर त्यांचे बोगस आधारकार्ड बनवून मुंबई, ठाणे, नवी मुंबईत आणून त्यांना बांधकामाच्या ठिकाणी रोजगार मिळवून देत होता. त्याने मागील काही वर्षांपासून अनेक बांगलादेशी बेकायदेशीरपणे (Bangladeshi Infiltrators) भारतात आणून त्यांचे बोगस आधारकार्ड बनवून दिले होते. अक्रम आणि त्याचा सहकारी बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींचे आर्थिक व्यवहार देखील पहात होता. बांगलादेशात हवालामार्फत (Hawala in Bangladesh) आर्थिक व्यवहार देखील करण्यात येत होते, अशी माहिती उघडकीस आली.

(हेही वाचा – Sand Policy : वाळू धोरणात सुधारणा करणार; राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती)

या दोघांच्या अटकेनंतर गुन्हे शाखेने बेकायदेशीररित्या रहाणाऱ्या बांगलादेशींचा शोध घेऊन एक महिलेसह ७ घुसखोर बांगलादेशी नागरिकांना विविध परिसरातून अटक करण्यात आली आहे.

अक्रमसारखे एजंट मुंबई भारतात मोठ्या प्रमाणात वावरत असून त्यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिकांनी भारतासह मुख्य शहरामध्ये बेकायदेशीरपणे घुसखोरी केल्याचे वास्तव समोर येत आहे. (Bangladeshi Infiltrators)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.