दिल्ली संसदेत लोकसभेत अचानक दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून खाली उडी मारून केंद्र सरकारचा निषेध केला. त्याचे पडसाद देशभरात उमटले, त्याचवेळी संसदेच्या आवारातही दोघेजण निदर्शने करत होते, त्यामध्ये चक्क स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी नीलम होती. नीलम (Neelam) ही हरियाणाचे असून सध्या ती हिसार येथे शिक्षण घेत आहे. नीलमला राजकारणात यायची इच्छा आहे.
काय आहे नीलमची विचारधारा?
संसदेच्या भावतेची सुरक्षा व्यवस्था झुगारून नीलम यांनी संसदेच्या आवारात येऊन आंदोलन केले. नीलांचे वडील मिठाई तयार करतात. २५ नोव्हेंबर राय घरी जाते असे सांगत नीलम (Neelam) घराबाहेर पडली, त्यानंतर ती थेट बुधवारी, १३ डिसेंबर रोजी संसदेच्या आवारात दिसली. हिसारमध्ये नीलम (Neelam) ही भाड्याच्या घरात राहत आहे. तिच्यासोबत राहणाऱ्या विद्यार्थिनींनी सांगितले की, नीलमला राजकारणात खूप रस होता. राजकारणाशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या चर्चेत ती सक्रियपणे सहभागी होत असे. दिल्ली पोलिसांनी नीलमला अटक केली तेव्हा तिने तिचे नाव नीलम असल्याचे सांगितले. भारत सरकारकडून आमच्यावर अत्याचार होत आहेत, आम्ही आमच्या हक्काबद्दल बोलतो तेव्हा आम्हाला लाठीचार्ज करून दडपले जाते. आमचा छळ होतो. याशिवाय आमच्याकडे कोणतेही माध्यम नव्हते, त्यामुळे आम्ही निदर्शने केली. आम्ही कोणत्याही संस्थेशी संबंधित नाही. आम्ही विद्यार्थी आहोत, आम्ही बेरोजगार आहोत आणि आमचे पालक मजूर म्हणून काम करतात. आमचे कोणी ऐकत नाही. आमचा आवाज सर्वत्र दाबला जात आहे, ही हुकूमशाही चालणार नाही, असे नीलम (Neelam) म्हणते.