Maharashtra Assembly Session : संसदेतील घटनेचे महाराष्ट्र विधीमंडळात पडसाद; अभ्यागतांना प्रवेश बंद

197

संसदेतील लोकसभेत प्रेक्षक गॅलरीतून २ तरुणांनी उडी मारल्यावर त्याचे पडसाद महाराष्ट्र विधानसभेत (Maharashtra Assembly Session) उमटले. संसदेतील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी अभ्यागतांना विधानभवनात प्रवेश बंद करण्यात आला आहे, तसेच आमदारांना केवळ २ पास दिले जातील, असे जाहीर केले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा मुद्दा मांडला

Maharashtra Assembly Session मध्ये विधानसभेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा मुद्दा मांडून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे लक्ष वेधले. लोकसभेत प्रेक्षक गॅलरीतून २ तरुणांनी सभागृहात उडी मारली. त्यांनी विषारी वायूच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे लोकसभेत गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. यासंबंधी आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे, असे चव्हाण यांनी सांगितले. या मुद्द्याची अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गंभीर नोंद घेतली. त्यांनी अधिकार्‍यांना आवश्यक तेवढेच पास देण्याची सूचना केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत येताना दिसलेल्या गर्दीचा मुद्दा उपस्थित केला.

(हेही वाचा Halal : महाराष्ट्रातही हलाल बंदी करा; विधानसभेत मागणी)

सुरक्षा रक्षकांना तात्काळ चोख सुरक्षा पडताळणी करण्याच्या सूचना

मी आताच भोपाळ येथून सभागृहात आलो. लॉबीत एवढी गर्दी होती की, आम्हाला नीट चालता येत नव्हते. त्यामुळे पास जारी करणे कमी करावे. दुसरीकडे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनीही या घटनेची गंभीर नोंद घेत अभ्यागतांना प्रवेशबंदी करण्याचे निर्देश दिले. त्या म्हणाल्या, ‘ही एक गंभीर घटना आहे. विधान परिषदेतील गॅलरी पासेस १३ डिसेंबरपासून बंद करण्यात येत आहेत. अभ्यागतांना सभागृह गॅलरीत प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे आमदारांनी पासेसविषयी पत्र पाठवू नये.’ लोकसभेतील घटनेनंतर तात्काळ येथील विधीमंडळाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. यासंबंधी सुरक्षा रक्षकांना तात्काळ चोख सुरक्षा पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.