राज्यातील ज्या जिल्ह्यात शासकीय रक्तपेढी नाही, अशा ठिकाणी संबंधित जिल्हा शल्य चिकित्सकांकडून प्रस्ताव मागवून दोन महिन्यांत रक्तपेढीचा प्रश्न मार्गी लावला जाईल, अशी घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी बुधवारी (१३ डिसेंबर) विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. याशिवाय विभागाच्या ३१ रक्तपेढ्यांमध्ये येत्या महिनाभरात अॅलिकॉट मशिन्स उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Blood Bank)
भाजपचे आमदार आशीष शेलार (Ashish Shelar) यांनी बुधवारी विधानसभेत अलिकॉट मशिन उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सहभागी होताना शिवसेनेच्या योगेश कदम यांनी रत्नागिरी जिल्ह्यात रक्तपेढी नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. रुग्णाच्या नातेवाईकांना रक्त आणण्यासाठी १०० किलोमीटर लांब जावे लागते, असे त्यांनी सांगितले. त्या प्रश्नाला उत्तर देताना तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी प्रत्येक जिल्ह्यात रक्तपेढी उभारण्याची घोषणा केली. (Blood Bank)
(हेही वाचा – Chandrakant Patil : लोकप्रतिनिधींना राज्याच्या प्रश्नांची जाण असणे आवश्यक – चंद्रकांत पाटील)
तत्पूर्वी, शेलार यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणारया ३१ रक्तपेढ्यांपैकी केवळ ८ रक्तपेढ्यांमध्ये तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या १४ रुग्णालयांपैकी केवळ तीन ठिकाणी अलिकॉट मशिन उपलब्ध असल्याची माहिती दिली. त्यावर सावंत (Tanaji Sawant) यांनी सभागृहाला अलिकॉट मशिनविषयी माहिती दिली. रक्ताशी संबंधित विविध प्रकारचे आजार असलेल्या लहान मुलांना प्रौढ रुग्णांप्रमाणे रक्ताची गरज लागत नाही. (Blood Bank)
रक्त वाया जाऊ नये यासाठी रक्ताच्या लहान पिशव्या तयार करणारे अलिकॉट यंत्र उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाच्या वैद्यकीय अधीक्षकांना राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत सूचना देण्यात आल्या आहेत. तेथेही एक महिन्यात अलिकॉट मशिन्स एक महिन्यात उपलब्ध करून देण्यात येतील. दरम्यान, चाचणी न करता रुग्णांना रक्त देण्याची परवानगी देता येणार नाही, असेही सावंत (Tanaji Sawant) यांनी स्पष्ट केले. (Blood Bank)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community