देशभरात खळबळ उडवणारी घटना बुधवार, १३ डिसेंबर रोजी घडली. संसदेचे अधिवेशन सुरु असताना लोकसभेत प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनाही चक्क सभागृहात उडी मारली आणि तिथेच मोठ्या प्रमाणात धूर फवारला (Parliament Smoke Attack). त्यानंतर खासदारांनी त्या तरुणांना पकडून बेदम मारहाण करत सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिले. त्याचवेळी संसदेच्या आवारातही दोन आरोपींनी घोषणाबाजी सुरु केली. या प्रकरणी सुरक्षा रक्षकांनी एकूण चार आरोपींना अटक केली, तर २ आरोपींचा शोध सुरू आहे. या सर्व आरोपींची सोशल मीडियातून मैत्री झाली होती, त्यानंतर त्यांनी संसद घुसण्याची योजना आखली होती.
कोण आहेत आरोपी?
पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. लोकसभेत वादग्रस्त कृत्य करणाऱ्या आरोपींची सागर आणि डी मनोरंजन अशी नावे आहेत. तर ज्या आरोपींना सभागृहाबाहेरून अटक करण्यात आली, त्यांची नीलम आणि अमोल शिंदे अशी नावे आहेत. संसदेच्या बाहेर आणि आत गोंधळ घालणारे चार आरोपी एकमेकांना ओळखतात. या आरोपींचा एकच उद्देश होता. हे चौघे सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना भेटल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर त्यांनी संसदेत घुसण्याचा (Parliament Smoke Attack) कट आखला.
प्रेक्षक गॅलरीतून आरोपीने मारली सभागृहात उडी
लोकसभेत धूर फवारणारा सागर शर्मा म्हैसूरचे भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या पासवर प्रेक्षक गॅलरीत आला होता. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दोघांनी प्रेक्षक गॅलरीतून चेंबरमध्ये उडी मारली. खुर्चीवर असलेले भाजपचे सदस्य राजेंद्र अग्रवाल यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केले. संसदेच्या सुरक्षेचा भंग झाल्यानंतर खासदार प्रताप सिम्हा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेऊन स्पष्टीकरण दिले. त्याचवेळी आरोपींना सुरक्षा दलांच्या ताब्यात देण्यापूर्वी खासदारांनी त्यांना बेदम मारहाण केली.
Join Our WhatsApp Community