Demoralized Opposition : अवसान गळालेला विरोधी पक्ष

एकूणच तांत्रिकदृष्ट्या दुसऱ्या आठवड्याचे कामकाज सुरु झाले असतानाही विरोधी पक्ष अद्याप नागपूरच्या थंडीत थंड झाल्याचे दिसत आहे.

218
Demoralized Opposition : अवसान गळालेला विरोधी पक्ष
Demoralized Opposition : अवसान गळालेला विरोधी पक्ष

राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (winter session) सुरु होऊन पाच दिवस झाले. मात्र अद्याप विरोधी पक्षाला सूर गवसलेला दिसत नाही. एकूणच तांत्रिकदृष्ट्या दुसऱ्या आठवड्याचे कामकाज सुरु झाले असतानाही विरोधी पक्ष अद्याप नागपूरच्या थंडीत थंड झाल्याचे दिसत आहे. याचे कारण, कदाचित राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ या तीन राज्यांत भाजपाला मिळालेल्या यशाने विरोधी पक्षातील तीनही पक्ष (काँग्रेस, राष्ट्रवादी-शरद पवार गट आणि उबाठा) आत्मविश्वास गमावून बसल्याची चिन्हे दिसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Demoralized Opposition)

फक्त १० मिनिटे सरकारविरोधी घोषणा

गेल्या गुरुवारी अधिवेशनाला सुरुवात झाली. अपेक्षेप्रमाणे पहिले दोन दिवस फार काही कामकाज झाले नाही. मात्र सोमवारपासून सुरु होणाऱ्या आठवड्यात विरोधी पक्ष सरकारला धारेवर धरेल अशी अपेक्षा होती. सोमवारी सकाळी महाविकास आघाडीच्या काही सदस्यांनी नेहमीप्रमाणे कांद्याचा मुद्दा उपस्थित करत गळ्यात कांद्याच्या माळा (onion), हातात लहानसे फलक घेऊन विधिमंडळ इमारतीच्या पायऱ्यांवर वृत्त वाहिन्यांसमोर १० मिनिटे सरकारविरोधी घोषणा दिल्या. (Demoralized Opposition)

नागपूरच्या थंड वातावरणात विरोधी पक्ष अंग झटकून ‘आक्रमणा’साठी सज्ज झाला असे वाटत असतानाच सभागृहात पोहोचताच त्यांनी तलावर म्यान केली. विधानसभा कामकाज कार्यक्रमपत्रिकेप्रमाणे ठरलेल्या वेळेत प्रश्नोत्तराचा तास सुरु झाला. त्यात आज्ञाधारक बालकाप्रमाणे विरोधी पक्षाने सहभाग घेतला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वानगीदाखल शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करीत ‘सभागृहाचे बाकी सर्व कामकाज बाजूला ठेऊन अवकाळी पाऊस आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा विषय’ चर्चेला घ्यावा अशी मागणी केली. अध्यक्षांनी यावर योग्य वेळी चर्चा करण्याची संधी दिली जाईल, असे सांगितले आणि विरोधी पक्ष थंड झाला. (Demoralized Opposition)

तास-दोन तास उपस्थिती दाखवत ठाकरे पिता-पुत्र गायब

गेली वर्षभर ‘शंभर खोक्यां’ची ओरड करणाऱ्या उबाठा गटाचे सदस्य पक्षप्रमुख, विधान परिषद सदस्य उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांचे सुपुत्र, वरळीचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दुपारी १.३० वाजता सभागृहात अधिवेशनाची हजेरी लावली. तास-दोन तास उपस्थिती दाखवून ठाकरे पिता-पुत्र जे निघाले ते पुन्हा सभागृहाकडे फिरकले नाहीत. वर्ष-दीड वर्षे ‘शंभर खोके एकदम ओके’चा धोशा लावणाऱ्यांनी हि घोषणा पाच दिवसात एकदाही दिली नाही. प्रवक्ते संजय राऊत यांनी अनेकदा शिंदे गटाच्या आमदार, मंत्र्यांवर वृत्त वाहिन्यांच्या माध्यमातून भ्रष्ट्राचाराचे आरोप केले, त्यावर उबाठा गटाने अद्याप अवाक्षर काढले नाही. (Demoralized Opposition)

(हेही वाचा – BMC Account Audit : मुंबई महापालिकेत सन १९९५ पासून मंजूर ऑडीटचे अहवाल प्रलंबितच?)

सभागृहाचा ‘डेकोरम’ पाळला गेला पाहिजे

उबाठा गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी बुधवारी नागपूर येथील पत्रकारांच्या ‘सुयोग’ निवासस्थानी भेट दिली तेव्हा अनौपचारिक गप्पा मारताना याबाबत सारवासारव केली. ते म्हणाले, “सभागृहाचा ‘डेकोरम’ पाळला गेला पाहिजे. बाहेर आंदोलन करतो तसे सभागृहात करून चालत नाही. बाहेर कांद्याची माळ गळ्यात घालू शकतो पण ते सभागृहात नाही चालणार. आपण घरात आणि बाहेत सारखेच वागतो का?” असा सवालही त्यांनी केला. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, “व्यक्तिगत टीका-टिप्पणी टाळायला हवी.” (Demoralized Opposition)

विशेष म्हणजे, विधानसभा कामकाज गेल्या पाच दिवसात २ मिनिटसाठीही तहकूब करण्याची वेळ अध्यक्षांवर आली नाही. एकूणच विधिमंडळाचे अधिवेशन खेळीमेळीच्या वातावरणात सुरु असल्याने नागपूरच्या थंडीचा आनंद द्विगुणित झाल्याची चर्चा विधिमंडळ परिसरात ऐकायला मिळत आहे. (Demoralized Opposition)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.