राज कपूर (Raj Kapoor) यांनी बनवलेले चित्रपट हे सामाजिक विषयाला घेऊन कमर्शियल चित्रपट असायचे. कोणताही विषय हाताळण्याची त्यांची पद्धत अद्भुत होती. त्यांना संगीताचे चांगले ज्ञान होते. म्हणूनच त्यांची चित्रपटातील गाणी खूप गाजली. कोणते गाणे रसिकांना आवडू शकते. याबाबत त्यांचा अभ्यास होता. असं म्हटलं जायचं की एडिटिंग रुममध्ये ते डोळे बंद करून बसायचे आणि अचानक एडिटची कमांड द्यायचे. इतका चित्रपट त्यांच्या नसानसात भिनला होता.
(हेही वाचा – Pakistan : भारताची गोपनीय माहिती पाकिस्तानला देणारा नौदलातील तरुण अटकेत)
अभिनय आणि निर्मिती यांत प्राविण्य
राज कपूर यांचा जन्म पेशावरमध्ये कपूर हवेली येथे १४ डिसेंबर १९२४ रोजी झाला. हिंदी चित्रपटांत त्यांनी मादक शैलीत प्रेमकथा मांडायला सुरुवात केली. ते स्वतः म्हणायचे की, मी नग्नतेचा उपासक आहे. पुढे त्यांची शैली अनेक दिग्दर्शकांनी उचलली आहे. त्यांना The Greatest Showman of Indian Cinema म्हटलं जातं. त्याचबरोबर भारताचा चार्ली चॅप्लिन (India’s Charlie Chaplin) म्हणूनही त्यांचा गौरव केला जातो.
१९३५ मध्ये वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी राज कपूर यांनी ‘इन्कलाब’ (Inquilaab) चित्रपटात काम केले होते. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी राज कपूर यांनी ‘इन्कलाब’ चित्रपटात काम केले होते. त्यावेळी त्यांनी बॉम्बे टॉकीज स्टुडिओमध्ये मदतनीस म्हणून काम केले. नंतर तो केदार शर्मासोबत क्लॅपर बॉय म्हणून काम करू लागला. पुढे त्यांनी १९४७ साली नीलकमल चित्रपटात नायकाची भूमिका साकारली. त्यानंतर त्यांनी अमर प्रेम (Amar Prem) हा उत्कृष्ट चित्रपट केला. आग या चित्रपटात त्यांनी अभिनय तर केलाच त्याचबरोबर ते या चित्रपटचे निर्माते आणि दिग्दर्शकही होते.
(हेही वाचा – Hasan Mushrif : महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलकडे ‘इतक्या’ विद्यार्थ्यांची नोंदणी; हसन मुश्रीफ यांची माहिती)
श्रीमंत असूनही होती ही सवय
१९५१ मध्ये आलेला आवारा (Awara) हा चित्रपट खूप गाजला आणि हिंदी सिने जगतात राज कपूर (Raj Kapoor) याम्चे नाव सुवर्ण अक्षरांत कोरले गेले. जेव्हा रणधीर कपूर आणि ऋतु नंदा ही त्यांची मुलं चीनमध्ये गेली होती. तेव्हा चिनी लोकांनी त्यांना पाहून ’आवारा हू’ हे गाणं म्हणलं. यालाच यश म्हणतात.
राज कपूर (Raj Kapoor) हे श्रीमंत असले तरी ते जमिनीवरच झोपायचे. इतकंच काय तर हॉटेलमध्ये राहत असतना देखील ते चादर जमिनीवर अंथरुन झोपायचे. ही सवय त्यांना लहानपणापासून लागली होती. राज कपूर यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले.
(हेही वाचा – Blood Bank : राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात रक्तपेढी उभारणार; तानाजी सावंत यांची घोषणा)
पुरस्कार आणि सन्मान
इतकंच काय तर आजही कपूर कुटुंब लोकांचं मनोरंजन करत आहे. राज कपूर (Raj Kapoor) यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना ३ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ११ फिल्मफेअर पुरस्कारांवर (Filmfare Awards) त्यांनी नाव कोरलं आहे. १९७१ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार (Padma Bhushan Award) प्राप्त झाला. तसेच १९८७ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार (dadasaheb phalke award) देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community