पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे एकमेव भारतीय दिग्दर्शक Shyam Benegal

207
अंकुर, निशांत, मंथन, भूमिका अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांद्वारे आपली ओळख निर्माण करणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक म्हणजे श्याम बेनेगल (Shyam Benegal). अशा श्याम बेनेगल यांचा जन्म १४ डिसेंबर १९३४ रोजी हैदराबाद येथे झाला. त्यांचे वडील मूळचे कर्नाटकाचे होते. विशेष म्हणजे श्याम बेनेगल यांची दिग्दर्शनाची सुरुवात वयाच्या १२व्या वर्षीच झाली असेच म्हणावे लागेल. त्यांच्या वडिलांनी त्यांना एक कॅमेरा दिला होता तेव्हा वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी एक चित्रपट बनवला.
त्यांनी हैदराबाद येथील उस्मानिया युनिव्हर्सिटीतून अर्थशास्त्रात एम.ए. केले आणि पुढे त्यांनी हैदराबाद फिल्म सोसायटीची स्थापना केली. लहानपणापासूनच त्यांना चित्रपटाची आवड होती. घरच्यांनी देखील त्यांची ही आवड जोपासली. लहानपणी घरचे सगळे लोक त्यांच्यासोबत प्रभात इत्यादी संस्थांनी बनवलेले चित्रपट आवडीने पाहू लागले. यातूनच त्यांच्यातला दिग्दर्शक घडत राहिला.

होमी जे. भाभा फेलोशिप प्रदान करण्यात आली

पुढे मुंबईतील लिटांस या कंपनीत ते कॉपिरायटर म्हणून काम करु लागले. त्यांनी १९६२ मध्ये गुजरात सरकारसाठी ’घेर बेठा गंगा; हा महिसागर धरणाची माहिती देणारा माहितपट तयार केला. त्यानंतर काही काळ त्यांनी ’एफटीआयआय’ येथे शिकवत होते. पुढे ते या संस्थेचे अध्यक्ष देखील झाले. त्यांना होमी जे. भाभा फेलोशिप प्रदान करण्यात आली, ज्यामुळे त्यांना चिल्ड्रन्स टेलिव्हिजन वर्कशॉप, न्यूयॉर्क आणि नंतर बोस्टनच्या WGBH-TV मध्ये काम करण्याची संधी मिळाली. १९७३ मध्ये त्यांनी अंकुर चित्रपट निर्माण केला. या चित्रपटाला द्वितीय उत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांची घोडदौड सुरुच राहिली.

समांतर चित्रपटांचा वारसा सक्षमपणे पुढे नेला

सत्यजित राय इत्यादी दिग्गज कलाकारांकडून प्रेरणा घेऊन श्याम बेनेगल यांनी समांतर चित्रपटांचा वारसा सक्षमपणे पुढे नेला. त्यांना १९७६ मध्ये पद्मश्री आणि १९९१ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १००७ मध्ये त्यांना त्यांच्या योगदानासाठी भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट हिंदी फीचर फिल्मचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पाच वेळा जिंकणारे ते एकमेव चित्रपट दिग्दर्शक आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.