Mohammed Shami For Arjuna : महम्मद शामीचं अर्जुन तर सात्त्विकसाईराज आणि चिरागचं मेजर ध्यानचंद खेलरत्नसाठी नामांकन 

बीसीसीआयने महम्मद शामीच्या नावाची विशेष शिफारस अर्जुन पुरस्कारासाठी केली आहे 

206
Mohammed Shami : महम्मद शामी द आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता 
Mohammed Shami : महम्मद शामी द आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता 

ऋजुता लुकतुके

भारतीय संघातील तेज गोलंदाज आणि एकदिवसीय विश्वचषकातील (Mohammed Shami For Arjuna) सर्वात यशस्वी गोलंदाज महम्मद शामीच्या नावाची शिफारस देशातील क्रीडा क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार अर्जुन पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. तर यंदाच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या बॅडमिंटनमधील भारताच्या अव्वल जोडीचं नामांकन झालं आहे.

महम्मद शामीने यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक २४ बळी टिपले. आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्घेच्या इतिहासातील तो भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाजही आहे. आधी शामीचं नाव अर्जुनसाठी नामांकन झालेल्या खेळाडूंच्या यादीत नव्हतं. पण, क्रीडा मंत्रालयातील सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने शामीची खास शिफारस केली आहे.

शामीबरोबरच आणखी १६ खेळाडूंचं  नामांकन अर्जुन पुरस्कारासाठी (Mohammed Shami For Arjuna) झालं आहे. यात कृष्णन बहादूर पाठक, सुशिला चानी हे हॉकीपटू, ओजस देवतळे आणि अदिती गोपीनाथ हे तिरंदाज, महम्मद हसमुद्दिन हा मुष्टियोध्या, वैशाली रमेशबाबू ही बुद्धिबळपटू, दिक्षा दागर ही गोल्फपटू, ऐश्वरी प्रताप सिंग तोमर हा नेमबाज, अंतिम पनघल हा कुस्तीपटू आणि ऐहिका मुखर्जी ही टेबलटेनिसपटू यांचा समावेश आहे.

(हेही वाचा-Old Pension Scheme : कर्मचारी संपावर ठाम)

द्रोणाचार्य पुरस्कारासाठी पाच प्रशिक्षकांचं नामांकन झालं आहे. यात गणेश प्रभाकरन आणि महावीर सैनी यांचाही समावेश आहे. तर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारासाठी कविता, मंजुशा कनवर आणि विनित कुमार शर्मा यांची शिफारस झाली आहे.

विविध क्रीडा पुरस्कारांसाठी झालेली नामांकनं 

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार : सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी (बॅडमिंटन) व चिराग शेट्टी (बॅडमिंटन)

अर्जुन पुरस्कार : महम्मद शामी (क्रिकेट), अजय रेड्डी (अंधांचं क्रिकेट), ओजस देवतळे, अदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी), शीतल देवी (पॅरा तिरंदाजी), पारुल चौधरी, एम श्रीशंकर (ॲथलेटिक्स), महम्मद हुसमुद्दिन (मुष्टियुद्ध), वैशाली रमेशबाबू (बुद्धिबळ), दिव्यकीर्ती सिंग, अनुष अगरवाला (घोडेसवारी), दिक्षा दागर (गोल्फ), कृष्णन बहादूर पाठक, सुशिला चानू (हॉकी), पिंकी (लॉन बॉल), ऐश्वरी प्रताप तोमर (नेमबाजी), ऐहिका मुखर्जी (टेबलटेनिस) व अंतिम पनघल (कुस्ती)

मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार : कविता (कबड्डी), मंजुषा कनवर (बॅडमिंटन) व विनित कुमार शर्मा (हॉकी)

द्रोणाचार्य पुरस्कार : गणेश प्रभाकरन (मल्लखांब), महावीर सैनी (पॅरा ॲथलेटिक्स), ललित कुमार (कुस्ती), आर बी रमेश (बुद्धिबळ) व शिवेंद्र सिंग (हॉकी)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.