Gutkha Godown Raid : नाशिकच्या गुटखा गोदामावरती छापा; लाखोंचा माल जप्त

अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सातपूर येथील एमएचबी कॉलनीत धाड टाकली असता या ठिकाणी विविध प्रकारचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा  एकूण ११ हजार २७२ रुपये किंमतीचा साठा विक्रीसाठी साठविला असल्याचे आढळले.

243
Gutkha Godown Raid : नाशिकच्या गुटखा गोदामावरती छापा; लाखोंचा माल जप्त

नाशिकच्या (Gutkha Godown Raid) पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पेठ रोड परिसरात अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईत दहा लाखापेक्षा अधिक किमतीचा गुटखा साठा जप्त केल्याचे समोर आले आहे. ही कारवाई बुधवारी (१३ डिसेंबर) रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे तर सातपूर येथे केलेल्या कारवाई मध्ये हजार रुपयांचा गुटखा सापडला आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळालेल्या गोपनीय (Gutkha Godown Raid) माहितीवरून सातपूर येथील एमएचबी कॉलनीत धाड टाकली असता या ठिकाणी विविध प्रकारचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा  एकूण ११ हजार २७२ रुपये किंमतीचा साठा विक्रीसाठी साठविला असल्याचे आढळले. हा साठा महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असल्याकारणाने या कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी पी.एस.पाटील यांनी ताब्यात घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास सातपुर पोलिस स्टेशनमार्फत करण्यात येत आहे.

(हेही वाचा – Old Pension Scheme : कर्मचारी संपावर ठाम)

तर बुधवारी पंचवटी पोलिस स्टेशनच्या (Gutkha Godown Raid) हद्दीत बाळकृष्ण निवास, ४६१४, बाळकृष्ण सदन, उन्नती हायस्कुलसमोर, पेठरोड, या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाला प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा विक्रीसाठी साठवणुक केल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्याअनुषंगे अन्न व औषध प्रशासन, कार्यालयाचे एक पथक घटनास्थळी गेले असता ते ठिकाण बंद होते.

आजुबाजूला चौकशी केली असता, जागामालक शिवाजी मधुकर पवार हे उपस्थित झाले, त्यांचा जबाब नोंदविला असता हे गोदाम दिनेश चंद्रकांत अमृतकर यांना भाड्याने दिल्याचे समजले. परंतू त्यांच्यासोबत कोणताही संपर्क झाला नाही. त्यानंतर मात्र गोदामाच्या खिडकीतून (Gutkha Godown Raid) डोकावून पाहिले असता, प्रतिबंधित अन्नपदार्थाची पोती साठविल्याचे आढळून आल्याने पंचवटी पोलिसांनी सांगितले.

(हेही वाचा – Lok Sabha Intrusion : गृह खात्याने दिले चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश)

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी (Gutkha Godown Raid) या गोदामावरील कुलूप तोडून आत प्रवेश केला. तेव्हा त्यांना तिथे प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा आढळून आला. त्याचे मोजमाप केले असता आतापर्यंत अंदाजे १० लाखाच्या वर प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा आढळून आला. अन्न व औषध प्रशासनाची जिल्हयात गुटख्याविरुध्द कार्यवाही सुरु राहणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.