Ind vs SA T20 : दुसऱ्या टी-२० सामन्यात जेव्हा रिंकू सिंगने स्टेडिअमची काच फोडली 

रिंकू सिंगने अलीकडे आश्वासक कामगिरी करत भारताच्या टी-२० संघातील आपलं स्थान जवळ जवळ निश्चित केलं आहे 

214
Ind vs SA T20 : दुसऱ्या टी-२० सामन्यात जेव्हा रिंकू सिंगने स्टेडिअमची काच फोडली 
Ind vs SA T20 : दुसऱ्या टी-२० सामन्यात जेव्हा रिंकू सिंगने स्टेडिअमची काच फोडली 

ऋजुता लुकतुके

भारतीय संघ दुसरा टी-२० सामना हरला असला तरी भारतासाठी या (Ind vs SA T20) सामन्यात जमेची बाजू होती ती कर्णधार सुर्यकुमार यादवचा फॉर्म आणि पाचव्या क्रमांकावर येऊन रिंकू सिंगने केलेली फटकेबाजी. रिंकूने टी-२० क्रिकेटमधील आपलं पहिलं वहिलं अर्धशतकही या सामन्यात ठोकलं.

३८ चेंडूंत ६८ धावा करताना त्याने २ षटकार आणि ९ चौकार लगावले. पाचवा क्रमांक हा टी-२० प्रकारात विशेष आव्हानात्मक. कारण, संघाची अवस्था काही असो तुमच्याकडून मैदानावर आल्या आल्या फटकेबाजीची आणि जलद धावा वाढवण्याची अपेक्षा असते. आणि ही कामगिरी आधी ऑस्ट्रेलिया आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रिंकू सातत्याने बजावतोय. त्यामुळे तो भरवशाचा फटकेबाज फलंदाज ठरला आहे. पण, गेबेखामधल्या खेळीनंतर रिंकू सिंगला एका गोष्टीसाठी माफीही मागावी लागली.

सामन्यानंतर कर्णधार सुर्यकुमार यादवशी बोलताना त्याने ही दिलगिरी व्यक्त केली. हा व्हीडिओ बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केला आहे.

रिंकू सिंगने हा काच फोडणारा षटकार ठोकला तो सामन्याच्या शेवटच्या षटकांत. आफ्रिकन कर्णधार मार्करम स्वत: गोलंदाजीला आला होता. आणि रिंकूने त्याला दोन लागोपाठ षटकार ठोकले. यातला एक तर साईडस्क्रीनच्याही पलिकडे प्रेक्षकांच्या गॅलरीवर आदळला. आणि चक्क गॅलरीची काच फुटली.

फुटलेल्या काचेसाठी माफी मागतानाच रिंकूने आपल्या जोरदार फटके खेळण्यातील सहजतेचं श्रेय आयपीएलला दिलं. ‘मी गेली ५-६ वर्षं क्रिकेट खेळतोय. आयपीएलमध्ये प्रत्येक विपरित परिस्थितीत कसं (Ind vs SA T20) शांत राहायचं याचे धडे मी घेतले आहेत. मी स्वत:वर विश्वास ठेवतो. आणि शांत राहतो. अलीकडे केलेल्या वेट ट्रेनिंगमुळे मनगटातील ताकद वाढली आहे,’ असं त्याने सुर्यकुमारशी बोलताना सांगितलं.

अलीकडे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतही तो उठून दिसला. गेबेखामध्ये प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी रिंकूला श्रेयस अय्यरच्या वर संधी दिली. आणि त्याचं रिंकूने सोनं केलं.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.