काल म्हणजेच बुधवार १३ डिसेंबर रोजी संसदेच्या (Lok Sabha Intrusion) अधिवेशनात २ जणांनी लोकसभेत आणि २ जणांनी संसदेच्या बाहेर धुडघूस घातला. एकूण ६ पैकी 4 जणांना अटक करण्यात आली आहे, एकजण फरार आहे, तर एकाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अशातच आता लोकसभा (Lok Sabha Intrusion) सचिवालयातील ७ कर्मचाऱ्यांना संसदेच्या सुरक्षेत बिघाड केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व कर्मचारी लोकसभेच्या सुरक्षेतील त्रुटीसाठी दोषी आढळले आहेत. गृहमंत्रालयानेही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.
संसद घुसखोरी प्रकरण : लोकसभा सचिवालयाकडून सात कर्मचारी निलंबित #LokSabhaIntrusion #Parliament #LokSabhaSecretariat #Sevenemployeessuspended pic.twitter.com/7LiAAcx4VE
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) December 14, 2023
(हेही वाचा – Old Pension Scheme : कर्मचारी संपावर ठाम)
विविध मुद्द्यांकडे सरकारचे लक्ष वेधणे हा या आरोपींचा मुख्य हेतू होता, असे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून (Lok Sabha Intrusion) उघड झाले आहे. या पाचही आरोपींनी पोलिसांना सांगितले की, ते बेरोजगारी, शेतकऱ्यांचे संकट आणि मणिपूरमधील हिंसाचार यासारख्या मुद्द्यांमुळे नाराज होते.
अटक केलेल्या आरोपींनी (Lok Sabha Intrusion) पोलिसांना सांगितले आहे की, संसदेत बसलेल्या लोकांना वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करता यावी यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक रंगीत धुराचा वापर केला. सर्व आरोपींची विचारधारा सारखीच होती. अशातच आत ते आरोपी कोणत्या संस्थेशी जोडलेले आहेत का हे शोधण्याचा सुरक्षा संस्था प्रयत्न करीत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community