Mahadev Betting App : येत्या २ महिन्यांत कारवाई पूर्ण करणार; गृहमंत्र्यांचे विधानसभेत उत्तर

Mahadev Betting App प्रकरणी आमदार आशिष शेलारांनी मांडली लक्ष्यवेधी

256
Mahadev Betting App : येत्या २ महिन्यांत कारवाई पूर्ण करणार; गृहमंत्र्यांचे विधानसभेत उत्तर
Mahadev Betting App : येत्या २ महिन्यांत कारवाई पूर्ण करणार; गृहमंत्र्यांचे विधानसभेत उत्तर

अनेक वलयांकित आणि प्रतिष्ठित व्यक्तींचा सहभाग समोर आलेल्या महादेव बेटिंग ॲप प्रकरणी आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात (Winter Sessions of Legislative Assembly) लक्ष्यवेधी सूचना मांडली आहे. महादेव बेटिंग ॲपद्वारे (Mahadev Betting App) देशामध्ये बेटिंग चालू आहे. त्याचा संबंध जगभरातील संस्थांशी आहे. एका खाजगी तक्रारीवर कारवाई करतांना सरकारने विशेष तपास पथक स्थापन केले आहे. या प्रकरणाची व्याप्ती पहाता हे प्रकरण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (NIA) सुपुर्द करावे, अशी मागणी आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली आहे. या वेळी आशिष शेलार यांनी या प्रकरणी सरकार कारवाई कधी पूर्ण करणार, अशी विचारणाही केली आहे.

(हेही वाचा – Tennis Hall of Fame : लिअँडर पेस आणि विजय अमृतराज यांचा मानाच्या टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश)

तपास आधीच ईडीच्या वतीने चालू

यावर उत्तर देतांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे की, सरकारने या प्रकाराची नोंद घेतली आहे. न्यायालयाच्या आदेशाने महाराष्ट्रात काही तक्रारी करण्यात येत आहेत. या प्रकरणाचा मुख्य तपास आधीच अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडीच्या ED) वतीने चालू आहे. त्यामुळे हे प्रकरण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (National Investigation Agency) करण्याचा प्रश्न येत नाही. सुपुर्द जी कारवाई राज्यांतर्गत चालू आहे, तिचा तपास २ महिन्यांच्या काळात पूर्ण करू.

आमदारांचा सरकारवर दबाव

या वेळी चर्चा करतांना आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनीही सरकारने ऑनलाईन जुगाराच्या जाहिरातींवर कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार नाना पटोले यांनीही चर्चेत सहभाग घेतला. यापूर्वी बच्चू कडू यांनी सचिन तेंडूलकर यांनी केलेल्या ऑनलाईन जुगाराच्या जाहिरातींवर जोरदार आक्षेप नोंदवला होता. (Mahadev Betting App)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.