Online Fraud : जवळपास तीन वर्षांपासून हॉटेल बंद, मात्र तरीही बुकिंग सुरूच …

पोलीस अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, या प्रकरणात आयपीसीच्या कलम ४१९ आणि आयटी कायदा ६६ (सी) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.

270
Online Fraud : जवळपास तीन वर्षांपासून हॉटेल बंद, मात्र तरीही बुकिंग सुरूच ...

तीन वर्षांपूर्वी बंद झालेल्या तरंगत्या हॉटेलचे ऑनलाइन बुकिंग (Online Fraud) होत असल्याची तक्रार वांद्रे पोलिसांनी दाखल करून घेतली आहे. त्या हॉटेलच्या मालकांनीच याविरोधात तक्रार नोंदवली असून यामधून ३० ते ३५ जणांची फसवणूक झाल्याचाही संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

सविस्तर माहितीनुसार, २०१६ मध्ये सुरु झालेलं वांद्रे वरळी सी लिंक येथील ए बी सेलेस्टिया हे एक तरंगते रेस्टॉरंट आहे. याचे मालक चेतन भेंडे (५३) यांनी आपल्या हॉटेलच्या नावाने ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) होत असल्याची तक्रार वांद्रे पोलिसांत नोंदवली आहे.

(हेही वाचा – Mahadev Betting App : येत्या २ महिन्यांत कारवाई पूर्ण करणार; गृहमंत्र्यांचे विधानसभेत उत्तर)

ए बी सेलेस्टिया हे तरंगणारे हॉटेल २०१६ पासून सुरु झालं होतं मात्र मध्ये कोरोना काळात हे रेस्टॉरंट बंद होतं आणि त्यानंतर वर्सोवा सी लिंक कोस्टल रोडच्या बांधकामामुळे देखील ए बी सेलेस्टियल बंद आहे. मात्र या बंद असलेल्या हॉटेलच्या नावाने ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) होत असल्याचं चेतन भेंडे यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी तशी तक्रार नोंदवली.

अशातच एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ग्राहकाने भेंडे यांना फोन केला आणि त्यांनी ५००० रुपयांना ए. बी. सेलेस्टियल येथे टेबल बुक केल्याची माहिती दिली. फोन करणाऱ्या व्यक्तीने भेंडेला सांगितले की, गुगलवर सर्च केल्यानंतर त्याला मनोज शर्मा नावाच्या व्यक्तीचा नंबर सापडला आणि त्याने क्यू. आर. कोडद्वारे (Online Fraud) त्याच्याकडून ५००० रुपये घेतले.

(हेही वाचा – Rohit Sharma on World Cup Defeat : ‘लोकांच्या प्रेमामुळे धक्क्यातून सावरु शकलो’)

पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंत भेंडे यांना अशा ऑनलाइन बुकिंगसाठी (Online Fraud) सुमारे ३० कॉल आले आहेत, त्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.

पोलीस अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, या प्रकरणात आयपीसीच्या कलम ४१९ आणि आयटी कायदा ६६ (सी) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. (Online Fraud)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.