Natya Sammelan : मुंबईत पार पडले अनोखे केळवण; नाट्यसृष्टीतील बॅकस्टेज कलाकारांच्या कार्याचा सन्मान

100th Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan च्या पार्श्वभूमीवर दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रात नुकताच पडद्यामागचे कलाकार असणारे तंत्रज्ञ, रंगमंच कामगार यांचा केळवण सोहळा पार पडला.

290
Natya Sammelan : मुंबईत पार पडले अनोखे केळवण; नाट्यसृष्टीतील बॅकस्टेज कलाकारांच्या कार्याचा सन्मान
Natya Sammelan : मुंबईत पार पडले अनोखे केळवण; नाट्यसृष्टीतील बॅकस्टेज कलाकारांच्या कार्याचा सन्मान

लग्नसराई चालू आहे. त्यामुळे केळवणांची रेलचेल चालू आहे. ही बातमी मात्र तशा प्रकारच्या केळवणाची नाही. हे एक अनोखे केळवण आहे. (100th Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan) मराठी नाट्यसृष्टीविषयी आदर वाढवणारे आहे. दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रात नुकताच हा केळवण सोहळा पार पडला. शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागचे कलाकार असणारे तंत्रज्ञ, रंगमंच कामगार यांचे हे केळवण आहे. ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून हा केळवण सोहळा पार पडला. बॅकस्टेज कलाकारांपैकी दोन जणांच्या मुलांचा सत्कारही या समारंभात करण्यात आला. (natya sammelan kelvan)

(हेही वाचा – Beach Mobile Toilets : पावणे दोन वर्षांनंतर समुद्र किनाऱ्यावरील फिरती स्वच्छतागृहे कागदावरच)

बॅकस्टेज कलाकारांच्या पंगतीला कलाकारांनी वाढले जेवण

मसालेभात, श्रीखंड, बटाट्याची भाजी, पोळी, वरणभात, त्यावर तुपाची धार, चटणी, कोशिंबीर, ताक, लोणचं-पापड अशा चविष्ट पदार्थांनी या केळवणाची रंगत वाढवली. ज्यांच्याशिवाय नाटकाचा प्रयोग सादर होऊच शकणार नाही, अशा नाट्यसृष्टीतील बॅकस्टेज कलाकारांच्या (Backstage Artist) या पंगतीला काही कलाकारही स्वत: आग्रह करून पदार्थ वाढत होते.

Natya Sammelan : मुंबईत पार पडले अनोखे केळवण; नाट्यसृष्टीतील बॅकस्टेज कलाकारांच्या कार्याचा सन्मान
Natya Sammelan : मुंबईत पार पडले अनोखे केळवण; नाट्यसृष्टीतील बॅकस्टेज कलाकारांच्या कार्याचा सन्मान
मान्यवरांसह १४० बॅकस्टेज कलाकार उपस्थित

दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रात पार पडलेल्या या सोहळ्याला अखिल भारतीय नाट्यपरिषदेचे (Akhil Bharatiy Marathi Natya Parishad) अध्यक्ष प्रशांत दामले, ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे, अभिनेत्री भार्गवी चिरमुले, अभिनेत्री प्राजक्ता माळी, नाट्यनिर्माते राहुल भंडारे, चंद्रकांत लोकरे, सूत्रधार गोट्या सावंत, माजी महापौर श्रद्धा जाधव, प्रकाशयोजनाकार शीतल तळपदे, नेपथ्यकार संदेश बेंद्रे, नरेंद्र-नंदिता जोशी, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे आणि सावरकर स्मारकाच्या कर्मचारी अदिती मडकीकर आदी उपस्थित होते.

या केळवण सोहळ्याला नाटकाचे सेट डिझायनर, बसचालक, टेम्पोचालक, सुतार असे सुमारे १४० बॅकस्टेज कलाकार उपस्थित होते. या सोहळ्याला स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहाची रंगमंच व्यवस्था पहाणारे निवृत्ती राऊळ, विनोद कातकर आणि योगेश कदम हेही उपस्थित होते.

(हेही वाचा – Parliament Attack : संसदेच्या सुरक्षेला मनुष्यबळाची कमतरता तर कारणीभूत नाही ना?)

बॅकस्टेज कामगारांच्या मुलांचा सत्कार

केशभूषाकार संध्या खरात यांची उच्च शिक्षण घेणारी कन्या प्रज्ञा खरात, बॅकस्टेज कामगार पांडुरंग मेटकरी यांची मेट्रो पायलट बनलेली कन्या स्वाती मेटकरी यांचा विशेष सन्मान या केळवण सोहळ्यात करण्यात आला. ‘शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या पार्श्वभूमीवर हा सुंदर सोहळा झाला. असा उपक्रम माझ्या आठवणीत तरी आजपर्यंत कुणी केलेला नाही’, असे हृद्य मनोगत विजय केंकरे यांनी या केळवणाविषयी व्यक्त केले.

प्रशांत दामले (Prashant Damle) यांनीही ‘नाट्यपरिषदेने जे काम करायला हवं होतं, ते मुळ्ये यांनी केले आहे’, अशा शब्दांत ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांचे कौतुक केले. (Natya Sammelan)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.