Time to Break Fixed Deposits : मुदतठेवी बंद करण्याची हीच वेळ आहे का?

रिझर्व्ह बँकेनं व्याजदर सलग पाचव्यांदा स्थिर ठेवल्यामुळे मुदतठेवींवरील व्याजदरही जैसे थे राहिले आहेत. 

301
Time to Break Fixed Deposits : मुदतठेवी बंद करण्याची हीच वेळ आहे का?
Time to Break Fixed Deposits : मुदतठेवी बंद करण्याची हीच वेळ आहे का?
  • ऋजुता लुकतुके

रिझर्व्ह बँकेनं व्याजदर सलग पाचव्यांदा स्थिर ठेवल्यामुळे मुदतठेवींवरील व्याजदरही जैसे थे राहिले आहेत. (Time to Break Fixed Deposits)

अजूनही भारतीय लोकांसाठी गुंतवणुकीचं मस्त आणि स्वस्त साधन आहे ती मुदतठेव. मुदतीनंतर ठरलेली रक्कम मिळण्याची हमी आणि बचत खात्यापेक्षा जास्त परतावा यामुळे वर्षानुवर्षं लोकांचा कल मुदतठेवींकडे राहिला आहे. अलीकडच्याच एका सर्वेक्षणात ७० टक्के भारतीय मुदतठेवींमध्ये गुंतवणूक करतातच असा निष्कर्ष निघाला आहे. पण, काही तज्ञांच्या मते आता मुदतठेवीतील गुंतवणूक काढून घेण्याची वेळ आली आहे. कारण, कोव्हिड नंतर बँका आधीच्या ६ टक्क्यांच्या तुलनेत ८ ते ९ टक्क्यांपर्यंतचा परतावा ५ वर्षांच्या मुदतठेवींवर देत होत्या. तो परतावा आता कमी होऊ शकतो. (Time to Break Fixed Deposits)

रिझर्व्ह बँकेनं डिसेंबर २०२३ च्या पतधोरणात रेपो दर तसेच ठेवले. सलग पाचव्यांदा मध्यवर्ती बँकेनं हे दर कायम ठेवले. पण, येणाऱ्या दिवसांत हा कल बदलेल, असं तज्ञांना वाटतं. (Time to Break Fixed Deposits)

(हेही वाचा – Elon Musk : एलॉन मस्क यांच्या भारतात टेस्ला आणण्याच्या प्रयत्नांना धक्का)

मुदतठेवींवरील व्याजदर का कमी होणार?

रिझर्व्ह बँकेनं मे २०२२ पासून सातत्याने रेपोदर स्थिर ठेवले आहेत. तर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेनंही अकरा वेळा रेपोदर वाढवले. रेपो दर म्हणजे ज्या दराने मध्यवर्ती बँका व्यावसायिक बँकांना कर्ज देतात तो दर. बँकांसाठीचा कर्जावरील व्याजदर वाढला की, आपोआपच बँका ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजदरही वाढवतात आणि लोकांच्या हातात खर्च करायला पैसा कमी राहतो. परिणामी, महागाई दर आटोक्यात यायला मदत होते. असं हे रेपोदराचं गणित आहे. (Time to Break Fixed Deposits)

पण, रेपोदर वाढतो तेव्हा कर्जावरील व्याजदर वाढत असला तरी मुदतठेवींवरील व्याजदरही वाढतो. त्यामुळे कोव्हिड नंतरच्या काळात मुदतठेवींमधील गुंतवणुकीचे दर वाढले होते आणि लोकांची गुंतवणूकही वाढली. (Time to Break Fixed Deposits)

इथून पुढे मात्र मध्यवर्ती बँका पुन्हा एकदा रेपोदर कमी करण्याच्या दिशेनं जाऊ शकतात. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेनं तर तसे संकेत दिलेच आहेत. अशावेळी मुदतठेवींवरील व्याजदरही कमीच होणार. त्यामुळे तज्ञांच्या मते इथून पुढे मुदतठेवींवरील गुंतवणूक ही तुलनेनं किफायतशीर राहणार नाही. (Time to Break Fixed Deposits)

(हेही वाचा – Lok Sabha MP Suspension : लोकसभेच्या १४ खासदारांचे निलंबन)

मुदतठेवींत गुंतवणूक करणाऱ्यांनी काय करावं?

मुदतठेवींत गुंतवणूक करण्याची रणनीती अशावेळी थोडीफार बदलावी लागेल असं बँकबझार वेबसाईटचे कार्यकारी अधिकारी अनिल शेट्टी यांनी म्हटलं आहे. ‘नवीन गुंतवणूक करणाऱ्यांनी आपली मुदतठेवींची मुदत तीन वर्षांपर्यंत कमी करावी. म्हणजे तीन वर्षांसाठीच गुंतवणूक करावी आणि ज्यांची गुंतवणूक आहे अशांनी मुदतठेवीतील गुंतवणूक काढून घेण्याचा विचार करावा,’ असं शेट्टी यांनी सांगितलं. (Time to Break Fixed Deposits)

आणखी एक रणनीती त्यांनी सांगितली ती चढती गुंतवणूक. म्हणजे एकावेळी एकापेक्षा जास्त मुदतठेवी घ्यायच्या पण, त्यांची मॅच्युरिटी म्हणजे मुदत वेगवेगळी आणि चढत्या क्रमाने असेल. याला लॅडरिंग असं म्हणतात. (Time to Break Fixed Deposits)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.