Devendra Fadnavis : ऑनलाईन जुगाराच्या जाहिराती करू नका; देवेंद्र फडणवीस यांचे सेलिब्रिटींना आवाहन

महादेव अ‍ॅपप्रकरणी दोन महिन्यांत चौकशी

242
Badlapur ची घटना दुर्दैवी, निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी! - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऑनलाईन गेमिंग (online gambling) अर्थात जुगाराच्या सततच्या जाहिरातीमुळे खेळण्याचा मोह होऊन त्याची सवय जडते. त्यामुळे ऑनलाईन गेमिंगच्या जाहिराती करणाऱ्या व्यक्तींनी अशा जाहिराती करू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुरुवारी (१४ डिसेंबर) विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेवरील चर्चेच्या उत्तरात केले. अशा जाहिरातींवर नियंत्रण आणणे शक्य आहे किंवा कसे हे तपासून पाहिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. (Devendra Fadnavis)

जाहिराती करून जुगाराला प्रोत्साहन

भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी गुरुवारी विधानसभेत महादेव अ‍ॅपच्या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेत सहभागी होताना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी ऑनलाईन गेमिंगच्या जाहिरातींची तक्रार केली. चित्रपट सृष्टीतील तारेतारका, खेळाडू ऑनलाईन गेमिंगची (online gambling) जाहिराती करतात. त्याचा समाजावर दुष्परिणाम होत असल्याने या जाहिराती रोखण्यात याव्यात, अशी मागणी कडू यांनी केली. काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांनीही समाजातील प्रथितयश लोक टेलिव्हिजनवर जाहिराती करून जुगाराला प्रोत्साहन देत असल्याची तक्रार केली. या प्रश्नांना देताना फडणवीस यांनी ऑनलाईन गेमिंगची कार्यपद्धती सभागृहाला सांगितली. (Devendra Fadnavis)

प्रत्यक्षातील जुगार आता ऑनलाईनवर आला आहे. त्यासाठीचे अ‍ॅप दुबईहून नियंत्रित केले जातात. ऑनलाईन गेम खेळताना आयडी क्रमांक दिला जातो. त्यानंतर अनेकजण वेगवेगळ्या माध्यमातून चार बँकांमध्ये खाती काढतात आणि वेगवेगळे खेळाडू बनून ते खेळ खेळतात. त्यामुळे अशा खेळावर नियंत्रण आणण्यात अडचण नाही. मात्र, डार्कनेटवर सुरु असलेले गेम थांबवणे कठीण आहे. त्यामुळे यासंदर्भात कडक नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारला विनंती केली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. (Devendra Fadnavis)

(हेही वाचा – Natya Sammelan : मुंबईत पार पडले अनोखे केळवण; नाट्यसृष्टीतील बॅकस्टेज कलाकारांच्या कार्याचा सन्मान)

कंपन्यांना डेटा शेअरिंग करणे बंधनकारक

ऑनलाईन जुगार हा व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून चालतो. या जुगावरावर आपण नियंत्रण करू शकत नाही. मात्र, जेव्हा व्यक्तींची संख्या वाढते तेव्हा याची व्याप्ती लक्षात येते. पोलिसांच्या सायबर विभागाला येथे प्रवेश मिळत नाही. त्यामुळे कंपन्यांना डेटा शेअरिंग करणे बंधनकारक केले पाहिजे यासाठी केंद्र सरकारला (Central Govt) विनंती केली जाईल, असे फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. दरम्यान, महादेव अ‍ॅपकडून ६७ साईट चालवल्या जातात. या पोर्टलची नोंदणी दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला येथे आहे. बँक खाते, पासवर्ड, ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन गेमिंग चालते, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. (Devendra Fadnavis)

महादेव अ‍ॅपची ईडीमार्फत चौकशी

महादेव ॲप (Mahadev App) आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्या अमित शर्मा यांच्या कंपनीला पैसे पुरविणाऱ्या रशेश शहा आणि एडेलवाईज कंपनी तसेच त्यामध्ये झालेल्या व्यवहाराची येत्या दोन महिन्यात चौकशी करण्यात येईल, असे फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. महादेव अ‍ॅपची (Mahadev App) ईडीमार्फत चौकशी सुरु आहे. या गुन्ह्याची व्याप्ती पाहून एसआयटी (SIT) नेमण्यात आली आहे. बेटिंग अ‍ॅप कंपन्यांकडून त्यांना मिळालेल्या नफ्यातील रकमेवर जीएसटी न भरता सरकारी तिजोरीची नुकसान केल्याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचे फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. (Devendra Fadnavis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.