नागपूर येथे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session of Maharashtra Legislature) सुरू आहे. त्याच सोबत शिवसेना (Shivsena) आमदार अपात्रतेच्या प्रकरणी सुनावणीही चालू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, आमदार अपात्रतेच्या प्रकरणी ३१ डिसेंबरपर्यंत निकाल द्यायचा आहे. ही समयमर्यादा गाठता येईल का, या विषयी चर्चा चालू आहे. आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी न्यायालयाने दिलेल्या समयमर्यादेत होऊ शकते.
(हेही वाचा – Natya Sammelan : मुंबईत पार पडले अनोखे केळवण; नाट्यसृष्टीतील बॅकस्टेज कलाकारांच्या कार्याचा सन्मान)
३ आठवड्यांचा अतिरिक्त वेळ मागणार ?
असे असले, तरी या सुनावणीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यासाठी वेळ वाढवून द्यावा, अशी विनंती विधिमंडळाकडून सर्वोच्च न्यायालयाला केली जाऊ शकते, असे राजकीय वर्तुळातून सांगितले जात आहे. विधानसभा अध्यक्षांकडून (Rahul Narwekar) सर्वोच्च न्यायालयाकडे (Supreme Court) ३ आठवड्यांचा अतिरिक्त वेळ मागितला जाण्याची शक्यता आहे.
‘या’ असू शकतात अडचणी…
आमदार अपात्रतेप्रकरणी उबाठा गटाच्या (Uddhav Thackeray) आमदारांची उलट तपासणी पूर्ण झाली आहे. सध्या नागपूर येथे शिवसेना शिंदे (Eknath Shinde) गटाच्या आमदारांची उलट तपासणी सुरू असून साक्षी नोंदवण्याचे काम केले जात आहे. २० डिसेंबरपर्यंत दोन्ही बाजूच्या साक्षी नोंदवणे आणि उलट तपासणीचे काम पूर्ण होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. असे असले, तरी ३१ डिसेंबरपर्यंत निकाल लावण्यात अडचणी येऊ शकतात. २१ ते ३१ डिसेंबर कालावधीत निकालाचे लेखन करणे कठीण असल्याचे समोर येत आहे.
(हेही वाचा – Parliament Attack : संसदेत घुसखोरी करणाऱ्यांवर UAPA अंतर्गत खटला दाखल)
या प्रकरणात २ लाख पानांचे दस्तावेज तयार करण्यात आले आहेत. ३४ याचिकांचे ६ गटांत वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे विविध ६ निकाल लागणार आहेत. त्यामुळे ६ याचिकांचे निकाल लावण्यासाठी अधिक वेळेची मागणी करण्याची तयारी चालू आहे. (Mla Disqualification Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community