टी.एन. शेषन (T.N. Seshan) यांचे पूर्ण नाव ‘तिरुनेलाई नारायण अय्यर शेषन’ आहे. ते भारताचे दहावे ‘मुख्य निवडणूक आयुक्त’ होते. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी १२ डिसेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९६ हा काळ त्यांनी चांगलाच गाजवला. त्यांच्या कार्यकाळात स्वच्छ आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.
टी.एन. शेषन (T.N. Seshan) यांचा जन्म १५ मे १९३३ रोजी केरळमधील पालघाट जिल्ह्यातील तिरुनेलाई गावात एका साधारण मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. मद्रासच्या ‘ख्रिश्चन कॉलेज’मधून त्यांनी पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. येथेच त्यांनी काही काळ व्याख्याता म्हणूनही काम केले. नंतर त्यांची ‘भारतीय प्रशासकीय सेवा’ (आयएएस) साठी निवड झाली आणि १९५५ पासून शेषन यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली.
(हेही वाचा Parliament Attack : संसदेतील घुसखोरी शहरी नक्षलवाद्यांचा कट?)
टी.एन. शेषन (T.N. Seshan) यांची प्रतिमा निडर, कठोर आणि प्रामाणिक प्रशासक अशी होती. या कार्यशैलीमुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पण त्यांनी कधीही राज्यकर्त्यांसमोर झुकते माप घेतले नाही. त्यांचे तत्कालीन केंद्र सरकार आणि अनेक नेत्यांशी वाद झाले. शेषन हे त्यांच्या कार्यकाळात खूपच चर्चेत होते.
ते १९९० मध्ये भारताचे दहावे ‘मुख्य निवडणूक आयुक्त’ झाले. १९९६ पर्यंत ते या पदावर होते. या काळात शेषन यांनी मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत अनेक सुधारणा केल्या. मतदारांचे सक्षमीकरण, निवडणूक प्रक्रियेत सुधारणा आणि व्यवस्थेची धर्मनिरपेक्ष प्रतिमा या दिशेने काम करण्यास सुरुवात केली.
देशातील प्रत्येक प्रौढ नागरिकासाठी ‘मतदार ओळखपत्र’ हे त्यांच्या पुढाकाराचे फलित होते आणि राजकीय पक्षांच्या खर्चाला आळा घालणे इत्यादी अनेक महत्त्वाचे पाऊल त्यांनी उचलले. शेषन यांनी त्यांचे काम पूर्ण प्रामाणिकपणे आणि संघर्षाने केले. कारण संघर्ष हा त्यांच्य अकारकिर्दीचा एक महत्वाचा पैलू राहिला आहे.
Join Our WhatsApp Community