भारताचा बेस्ट स्ट्राइकर फुटबॉलपटू Bhaichung Bhutia

533
ज्याप्रमाणे भारतात क्रिकेटला प्राधान्य दिलं जातं, त्याप्रमाणे फुटबॉलला प्राधान्य दिलं जात नाही. येनार्‍या काही वर्षांत भारत फुटबॉलमध्येही चांगली कामगिरी करु शकेल असं वातावरण निर्माण होत आहे. आज आम्ही तुम्हाला एका जबरदस्त भारतीय फुटबॉलपटूबद्दल सांगणार आहोत. त्या खेळाडूचं नाव आहे भाईचुंग भुतिया (Bhaichung Bhutia).
भाईचुंग भुतिया (Bhaichung Bhutia) चा जन्म १५ डिसेंबर १९७६ रोजी सिक्कीममध्ये झाला. भायचुंग भुतियाने भारतीय फुटबॉल संघाला जगभरात एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. फुटबॉलमधील त्याच्या शूटिंग कौशल्यामुळे त्याला सिक्कीमी स्नॅपर असे टोपणनाव दिले गेले. प्रख्यात भारतीय खेळाडू आय. एम. विजयन यांनी भाईचुंगचे वर्णन “भारतीय फुटबॉलला देवाची भेट” असे केले आहे.
१९९३ मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी त्याने ईस्ट बंगाल एफ.सी. कलकत्ता येथे प्रवेश घेण्यासाठी शाळा सोडली. दोन वर्षांनंतर त्याला  जेसिटी मिल्स, फगवाडा येथे पाथवण्यात आले आणि त्या संघाने १९९६-९७  मध्ये इंडिया नॅशनल फुटबॉल लीग जिंकली. भुतिया हा लीगमधील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू होता आणि नेहरू चषकातील त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी त्याची निवड झाली होती. त्याने १९९६ “इंडियन प्लेयर ऑफ द इयर” हा किताब पटकावला.
३० सप्टेंबर १९९९ रोजी तो इंग्लंडमधील ग्रेटर मँचेस्टर येथे खेळण्यासाठी परदेशात गेला. भाईचुंग भुतिया (Bhaichung Bhutia) हा मोहम्मद सलीमनंतर युरोपमध्ये व्यावसायिक खेळाडू म्हणून खेळणारा दुसरा भारतीय फुटबॉलपटू ठरला. त्याने इंग्लंड क्लबसोबत ३ वर्षांचा करार केला होता. तो अनेक परदेशी क्लबकडून खेळणारा पहिला भारतीय फुटबॉलपटू ठरला. यानंतर भुतिया फुलहॅम, वेस्ट ब्रॉमविच अल्बिओन आणि अॅस्टन व्हिला यांच्या चाचण्यांमध्ये यशस्वी ठरला.
१९९७ मध्ये तो पूर्व बंगाल एफ.सी मधून खेळू लागला. १९९८-९९ मध्ये तो संघाचा कर्णधार बनला. याव्यतिरिक्त १९९९ मध्ये अर्जुन पुरस्कार प्राप्त करणारा तो १९ वा फुटबॉलपटू ठरला. भविष्यात भाईचुंग याचा आदर्श घेऊन नक्कीच अनेक उत्तम भारतीय फुटबॉलपडू तयार होतील यात वाद नाही.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.