कोल्हापूरची अंबाबाबई व तिरूपती येथील बालाजी मंदिर या दोन धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत होता. याच साठी कोल्हापूर (Kolhapur) ते तिरूपती (tirupati) ही विमानसेवा सुरू करण्यात आली होती. तसेच केंद्र शासनाच्या उडान योजनेतून तिकीट दरही कमी होते. मात्र ही विमानसेवा शुक्रवार (१५ डिसेंबर) पासून इंडिगो विमान कंपनी बंद करत असल्याचे घोषित केले. त्यामुळे गुरुवार(१४ डिसेंबर) हा या सेवेचा शेवटचा दिवस ठरला. (Kolhapur Tirupati Flight)
करोनाच्या काळात ही सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर २०२१ साली ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली होती. अनेक भाविक तिरूपतिचे दर्शन घेतल्यानंतर कोल्हापूरला जातात. या सेवेला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. मात्र
कोल्हापूर विमानतळ केंद्र शासनाच्या उडान योजनेतून रद्द झाले. परिणामी या सेवेचे तिकीट दरही वाढले. याचा परिणाम प्रवाशांवर होत गेला. त्यामुळे कोल्हापूर तिरूपती विमानसेवा बंद झाली. (Kolhapur Tirupati Flight )
(हेही वाचा : Mathura : मथुरेतील शाही ईदगाह संकुलाच्या ASI सर्वेक्षणाला अलाहाबाद उच्च न्यायालयाची मान्यता)
तर याच कंपनी कडून पर्यायी व्यवस्था म्हणून कोल्हापूर-हैद्राबाद- तिरूपती अशी सेवा सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र त्याचे दर दोन ते अडीच हजारांनी वाढले आहेत. डिसेंबर महिन्यात अनेक लोक प्रवासनिमित्त बाहेर पडतात. त्यातच ही सेवा रद्द झाल्याने अनेक लोकांमध्ये नाराजी पसरली आहे. तर या शेवटच्या विमासेवतून गुरुवारी ६८ प्रवासी कोल्हापूरला आणि ५४ प्रवासी तिरूपतीला गेले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community