राज्यातील काही भागात (Weather Update) थंडीची चाहूल लागली आहे तर दुसरीकडे अजूनही काही भागात पाऊस सुरु आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस राज्यात थंडी आणि पावसाचा खेळ रंगणार आहे.
(हेही वाचा – Ind vs SA 3rd T20 : दक्षिण आफ्रिकेचा १०६ धावांनी धुव्वा उडवत भारतीय संघाची मालिकेत १-१ ने बरोबरी )
सविस्तर माहितीनुसार, भारतीय हवामान विभागाने (Weather Update) पुढील दोन दिवसांत देशासह राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार, तामिळनाडू येथे १५ ते १७ डिसेंबर, केरळ येथे १६ ते १८ डिसेंबर तर लक्षद्वीप येथे १७ आणि १८ डिसेंबर रोजी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासाह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
(हेही वाचा – Farmers Suicide : राज्यात २ हजार ४७८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या)
तर जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट मुझफ्फारबाद येथे हलका पाऊस (Weather Update) आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पुढील ४८ तासात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर काही भागात ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी थंडी पडण्याची शक्यता आहे. (Weather Update)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community