Lalit jha : संसदेत घुसखोरी करणारा मुख्य सूत्रधार ललित झा दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

लोकसभेत झालेल्या घुसखोरीचा प्रमुख सूत्रधार हा ललित झा हाच असल्याचा पोलिसांना दाट संशय होता. त्याअनुषंगाने त्याचा शोध सुरू झाला.

212
Lalit jha : संसदेत घुसखोरी करणारा मुख्य सूत्रधार ललित झा दिल्ली पोलिसांच्या ताब्यात
Lalit jha : संसदेत घुसखोरी करणारा मुख्य सूत्रधार ललित झा दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

संसदेत घुसखोरी करणारा मुख्य सूत्रधार ललित झा (Lalit Jha) याला दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) ताब्यात घेतले आहे. ललित झा हा संसदेत घुसखोरी झाल्यानंतर या घटनेच्या वेळी तो संसदेजवळ उपस्थित होता.मात्र गोंधळ सुरू झाल्यावर तो पळून गेला. तर यासंदर्भात पोलिस लवकरच अधिकृत माहिती  देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Lalit jha)
लोकसभेत झालेल्या घुसखोरीचा प्रमुख सूत्रधार हा ललित झा हाच असल्याचा पोलिसांना दाट संशय होता. त्याअनुषंगाने त्याचा शोध सुरू झाला. तर याची चौकशी केल्यानंतर त्यांनी आपण १३ डिसेंबर हीच तारीख निश्चित केली होती. ललित हा या प्रकरणांनातर राजस्थानला पळून गेला. त्यानंतर तो त्यांच्या सहकाऱ्यांना भेटला आणि हॉटेल मध्येच राहिला. त्याचा शोध दिल्ली पोलीस घेत आहेत असे कळताच ललित बसने दिल्लीला आला. पोलिसांनी त्यांनतर ललीतला अटक केले.

गुरुग्राम मध्ये ललित झा याने एक बैठक घेऊन हा संपूर्ण कट रचला. असे पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे. तर संसदेच्या प्रेक्षक गॅलरीतून या प्रकारच शुटींग ललितनेच केले आणि सोशल मीडिया वर अपलोड केल. तसेच या प्रकारात शामील असणारे इतर चौघेही याच्या संपर्कात होते.

(हेही वाचा :Weather Update : पुढील दोन दिवसांत देशासह राज्यात पावसाची शक्यता; शेतकरी चिंतेत)

तर या घटना होण्यापूर्वी ललित याने या सर्वांचे फोन ताब्यात घेतले आणि तो फरार झाला. तर ललीतच शेवटचे लोकेशन नीमरानाजवळ ट्रॅक झाले आहे. तर त्याने ज्या एनजीओ ला हा व्हिडिओ पाठविला यांची तपासणीही चालू आहे. तर या घुसखोरीचे प्लॅनिंग वर्षभरापासून सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ललित हा त्याचे स्थान सतत बदलत होता. त्याचे शेवटचे लोकेशन’राजस्थान असल्याचे सांगण्यात आले आणि त्याचे कोलकाता कनेक्शन असल्याचे उघड झाले. मात्र पोलिसांनी त्याला दिल्ली येथून पकडले आहे. अवघ्या ३४ तासात त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.