ISRO : चंद्राच्या पृष्ठभागावरील दगडांचे नमुने अभ्यासासाठी पृथ्वीवर आणण्याचा विचार – एस.सोमनाथ

चंद्राच्या पृष्ठभागावरील दगडांचे नमुने अभ्यासासाठी पृथ्वीवर आणण्याचा विचार इस्रो ही भारताची अवकाश संशोधन संस्था करत आहे. ती मोहीम येत्या चार वर्षांच्या अंत पार पाडण्याचे ध्येय इस्रो ने ठेवले आहे.

233
ISRO : चंद्राच्या पृष्ठभागावरील दगडांचे नमुने अभ्यासासाठी पृथ्वीवर आणण्याचा विचार - एस.सोमनाथ
ISRO : चंद्राच्या पृष्ठभागावरील दगडांचे नमुने अभ्यासासाठी पृथ्वीवर आणण्याचा विचार - एस.सोमनाथ

चंद्रयान-३ (Chandrayan-3) तसेच आदित्य एल-१ सौर मोहीम अशा एकाहून एक मोहीमा इस्रो (ISRO) च्या वतीने करण्यात आल्या आहेत. या  यशस्वी महिमेनंतर आता भारताने चंद्राच्या संशोधनासाठी पुढचे पाऊल टाकण्याचे ठरविले आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरील दगडांचे नमुने अभ्यासासाठी पृथ्वीवर आणण्याचा विचार इस्रो ही भारताची अवकाश संशोधन संस्था करत आहे. ती मोहीम येत्या चार वर्षांच्या आत पार पाडण्याचे ध्येय इस्रो ने ठेवले आहे. ही माहिती इस्रोचे अध्यक्ष (Isro Chief) एस.सोमनाथ (S.Somnath) यांनी राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात (आरबीसीसी) येथे गुरुवारी एका व्याख्यानात दिली. (ISRO)

(हेही वाचा : Lalit jha : संसदेत घुसखोरी करणारा मुख्य सूत्रधार ललित झा दिल्ली पोलिसांच्या ताब्यात)

पुढे बोलताना ते म्हणाले की, चंद्राच्या पृष्ठभागावरील दगडांचे नमुने पृथ्वीवर आणण्याची मोहीम अतिशय गुंतागुंतीची आहे. चंद्रावर अवकाशयान पोहचल्यानंतर त्याने तेथील दगड व अन्य गोष्टींचे नमुने गोळा करण्याचे काम स्वयंचलित पद्धतीने होणार आहे. या प्रक्रियेत कोणताही मानवी हस्तक्षेप असणार नाही. या मोहिमेची आखणी करण्याचे काम सध्या इस्रो ने हाती घेतले आहे. २६ जानेवारीच्या संचलनात चंद्रयान-३ ची प्रतिकृती साकरण्यात येणार आहे. चंद्रयान-३ ची प्रतिकृती ही जेवढी बनविण्यात आली होती तेवढ्याच आकारात साकारली जाणार आहे. (ISRO)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.