ऋजुता लुकतुके
भारताचा तेज गोलंदाज महम्मद शामी (Mohammed Shami) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी शामीची (Mohammed Shami) निवड करतानाच तो उपलब्ध असेल तर असं त्याच्या नावासमोर लिहिलं होतं. कारण, तो सध्या घोट्याच्या दुखापतीवर उपचार घेत आहे.
क्रिकबझ या वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार, भारतीय खेळाडूंची दुसरी आणि शेवटची फळी आफ्रिका दौऱ्यासाठी १५ डिसेंबरला निघाली आहे. पण, यात शामीचा समावेश नाही. ‘रोहित शर्मासह उर्वरित सर्व भारतीय खेळाडू जोहानसबर्गला जाण्यासाठी शुक्रवारी पहाटे भारतातून निघाले आहेत. पण, या संघाबरोबर महम्मद शामी नाही,’ असं या बातमीत म्हटलं आहे.
रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमरा, रवीचंद्रन अश्विन, नवदीप सैनी आणि हर्षित राणा हे खेळाडू शुक्रवारी दुबई मार्गे दक्षिण आफ्रिकेत पोहोचतील. पण, ३३ वर्षीय शामीचा घोटा दुखावला आहे. आणि त्याला धावताना त्रास होतोय. अलीकडेच विजय हजारे चषक स्पर्धेतही शामी (Mohammed Shami) सहभागी झाला नव्हता. मुंबईतील एका फीजिओचा सल्ला घेण्यासाठी तो मुंबईत दोन दिवस आला होता.
(हेही वाचा-Special train For New Year : नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी पनवेल ते मडगाव १४ विशेष गाड्या)
तेव्हा त्याला झालेली ही दुखापत नसून शरीरातील बदलांमुळे त्याला हा त्रास जाणवत असल्याचं निदान डॉक्टरांनी केलं होतं. महम्मद शामी हा भारताचा विश्वचषकातील सर्वात यशस्वी गोलंदाज असून सध्या तो चांगल्या लयीत आहे. अशावेळी त्याची अनुपस्थिती भारतीय संघाला नक्कीच जाणवेल.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघ दोन कसोटी सामने खेळणार आहे. यातील पहिला २६ ते ३० डिसेंबर दरम्यान सेंच्युरियन इथं तर दुसरा कसोटी सामना ३ ते ७ जानेवारी दरम्यान केपटाऊन इथं होणार आहे. नवीन कसोटी हंगामातील भारताची ही दुसरी मालिका आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध भारताने मालिका १-० अशी जिंकली होती.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community