Crime : लसणाच्या चोरी वरून हमालाची हत्या, बोरिवली मार्केटमधील धक्कादायक घटना

333
Crime : लसणाच्या चोरी वरून हमालाची हत्या, बोरिवली मार्केटमधील धक्कादायक घटना
Crime : लसणाच्या चोरी वरून हमालाची हत्या, बोरिवली मार्केटमधील धक्कादायक घटना
लसूण चोरी करीत असल्याच्या संशयावरून एका व्यापाऱ्याने बोरिवलीच्या भाजी मार्केट मध्ये हमाली करणाऱ्या तरुणांच्या गुप्तांगावर लाथ मारल्याची घटना खळबळ जनक घटना समोर आली आहे. या घटनेत या हमालाचा मृत्यु (Crime) झाला असून बोरिवली पोलिसांनी व्यापाऱ्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून व्यापाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
पंकज मंडल असे या दुर्देवी हमालाचे नाव आहे. पंकज हा मूळचा झारखंड राज्यात राहणारा असून मागील ४ ते ५ वर्षांपासून बोरिवली पश्चिम येथील भाजी मार्केटमध्ये हमालीचे काम करून मार्केट परिसरातच इतर हमालासोबत एकत्र राहत होता. बोरिवली भाजी मार्केटमध्ये घनश्याम खाक्रोडिया हा व्यापारी मागील १० वर्षांपासून लसूण विक्रीचा व्यवसाय करतो.

(हेही वाचा-Mohammed Shami : महम्मद शामी द आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता )

घनश्याम याच्या गाळ्यातून मागील काही  महिन्यापासून लसणाची चोरी होत होती, ही चोरी हमाल पंकज मंडल हा करीत असल्याचा संशयावरून बुधवारी रात्री घनश्याम याने पंकज याला पकडून चोरीच्या संशयावरून सर्वांसमोर त्याला मारहाण करीत होता, दरम्यान घनश्यामने गुडघ्याने पंकजच्या गुप्तांगावर जोरदार प्रहार केल्यामुळे तो कळवळा व जमिनीवर कोसळला, त्यानंतर ही घनश्याम हा पंकजला लाथेने मारहाण करीत होती.
काही हमालांनी घनश्यामच्या तावडीतून पंकजची सुटका करून त्याला एका गाळ्यात झोपवले. दुसऱ्या दिवशी सकाळी पंकजचा मित्र आर्षद शेख हा त्याला उठविण्यासाठी गेला असता तो बेशुद्ध अवस्थेत पडला होता व त्याच्या डोज्यातून रक्तस्त्राव सुरू होता. अर्षदने तात्काळ पोलिसांना फोन करून याबाबत सूचना दिली. बोरिवली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंकजला पोलीस व्हॅन मधून शताब्दी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी बोरिवली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून व्यापारी घनश्याम खाक्रोडिया याला अटक करण्यात आली आहे.

हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=28xZ5gmoE6o

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.