- ऋजुता लुकतुके
२०२२ चा हंगाम श्रेयस (Shreyas Iyer) दुखापतीमुळे खेळला नव्हता. आता पुनरागमनाबरोबरच तो संघाचं नेतृत्वही करणार आहे. (Shreyas Iyer)
कोलकाता नाईट रायडर्स संघ प्रशासनाने २०२४ च्या हंगामासाठी श्रेयस अय्यरच (Shreyas Iyer) कर्णधार असेल असं स्पष्ट केलं आहे. आधीचा हंगाम दुखापतीमुळे तो खेळला नव्हता आणि तेव्हा नितिश राणाने संघाचं नेतृत्व केलं होतं. आता नितिश राणा उपकर्णधार असेल. (Shreyas Iyer)
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) गेल्यावर्षी पाठीच्या दुखापतीने बेजार होता आणि एप्रिल महिन्यात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर बंगळुरूच्या राष्ट्रीय अकादमीत त्याने रिहॅबिलिटेशन पूर्ण केलं. तो भारतीय संघात (Indian team) परतला तो थेट विश्वचषक स्पर्धेतच. मध्ये झालेली आयपीएल (IPL) आणि इतर मालिकांना तो मुकला होता. (Shreyas Iyer)
Quick Update 👇#IPL2024 @VenkyMysore @ShreyasIyer15 @NitishRana_27 pic.twitter.com/JRBJ5aEHRO
— KolkataKnightRiders (@KKRiders) December 14, 2023
आता श्रेयस (Shreyas Iyer) कोलकाता संघात परतला आहे आणि एकदिवसीय विश्वचषकात त्याने आपला फॉर्मही दाखवून दिला आहे. ‘मागच्या हंगामात श्रेयस (Shreyas Iyer) आमच्यासाठी खेळू शकला नाही हे आमचं दुर्दैव होतं. पण, आता तो परतलाय आणि संघाचं नेतृत्वही करणार आहे ही चांगली बातमी आहे. ज्या पद्धतीने त्याने दुखापतीतून सावरताना मेहनत घेतलीय आणि त्यानंतर विश्वचषकात जी कामगिरी केलीय त्यातून त्याचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं,’ असं कोलकाता नाईटरायडर्स संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी मैसूर (Venky Mysore) यांनी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. (Shreyas Iyer)
(हेही वाचा – BMW M3 : बीएमडब्ल्यू एम सीरिजची ‘ही’ कार आहे सगळ्यात जलद आणि स्पोर्टी )
श्रेयसच्या (Shreyas Iyer) अनुपस्थितीत नितिश राणाने बजावलेल्या कामगिरीचंही संघ प्रशासनाने कौतुक केलं आहे. तर श्रेयसनेही नितिश राणाचे आभार मानले आहेत. ‘मी दुखापतीने गेला हंगाम खेळलो नाही. संघ अशा बऱ्याच अडचणींतून जात होता. अशावेळी नितिश राणाने केलेलं खंबीर नेतृत्व कौतुकास्पद होतं. त्याला संघ प्रशासनाने उपकप्तान केलं याचा मला आनंदच आहे,’ या शब्दात श्रेयसने नितिशचं कौतुक केलं आहे. (Shreyas Iyer)
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या भारतीय संघाकडून दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. (Shreyas Iyer)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community