ऋजुता लुकतुके
टर्कीमध्ये एकाच आठवड्यात खेळाच्या मैदानावर दोन धक्काबुक्की आणि मारामारीच्या घटना घडल्या आहेत. अदाना इथं झालेल्या व्हॉलीबॉलच्या लीग सामन्यात (Volleyball Team Attacked in Turkey) मैदानावर प्रेक्षक घुसले. आणि त्यांनी केलेल्या हल्ल्यात एका महिला खेळाडूला दुखापत झाली असून तिला गुडघ्याला टाके पडले आहेत.
मलातया क्लबचे अध्यक्ष मेसुत काराबलूत यांनी सामन्यानंतर स्थानिक संघ आणि प्रेक्षकांविरुद्ध पोलीस तक्रार केली आहे. ‘बेलेदिये संघाचे खेळाडू आणि पाठिराखे दोघंही अभद्र भाषा वापरत होते. प्रेक्षक तर खेळाडूंवर काच आणि प्लास्टिकच्या बाटल्या फेकून मारत होते. अशा वागणुकीचा आम्ही निषेध करतो,’ असं मेसुत पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
मलातया संघाच्या एका खेळाडूला गुडघ्यावर पाच टाके पडले आहेत. आणि सामना संपल्यानंतर खेळाडूंना लॉकर रुममध्ये जाण्यापासून प्रेक्षकांनी रोखलं अशी तक्रार मेसुत यांनी केली आहे. विशेष म्हणजे या घटनेच्या एकच दिवस आधी टर्कीमध्ये अंकारा या राजधानीच्या शहरात फुटबॉल मैदानावरही चकमक झाली होती.
(हेही वाचा-Shreyas Iyer : आयपीएलच्या पुढील हंगामात श्रेयस अय्यर कोलकाता संघाचा कर्णधार )
अंकारा क्लबच्या संघ मालकांनी पंचांचा निर्णय न पटल्यामुळे चक्क पंचांच्या गालात ठोसा लगावला होता. पाठोपाठ खेळाच्या मैदानातून प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीची ही बातमी समोर आली आहे. टर्कीमध्ये खेळांच्या विविध लीग कार्यरत आहे. आणि इथे क्लब आणि लीगची मोठी संस्कृती आहे. पण, खेळात राजकारण मोठ्या प्रमाणावर घुसलं आहे. आणि क्लबचे मालक हे मोठ्या राजकीय पक्षांचे पाठिराखे आहेत. इथं मैदानावर धसमुसळेपणा (Volleyball Team Attacked in Turkey) अनेकदा होतो.
फुटबॉलमध्ये पंचांना ठोसा लगावणारे संघाचे मालक फारुक कोका हे सत्तारुढ पक्षाचे आणि अध्यक्ष रेचप तय्यब आर्दोआन यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांनी परवाच्या प्रकरणानंतर राजीनामा दिला आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community