Winter Session : बेरोजगारी, पेपरफुटी, पदभरती प्रश्नांवर विरोधक आक्रमक

विरोधकांनी परिसरात मोर्चा काढत "नुसत्या घोषणा आणि जाहिराती कधी होणार पद भरती" "सरकार देतय आश्वासने खोटी, प्रत्येक परीक्षेत पेपरफुटी" अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.

176
Winter Session : बेरोजगारी, पेपरफुटी, पदभरती प्रश्नांवर विरोधक आक्रमक
Winter Session : बेरोजगारी, पेपरफुटी, पदभरती प्रश्नांवर विरोधक आक्रमक

नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या शुक्रवारी (१५ डिसेंबर) सातव्या दिवशीही विधिमंडळ परिसरात विरोधक राज्यातील वाढती बेरोजगारी, पेपरफुटी, पदभरती प्रश्नांवर आक्रमक झाले. त्यांनी परिसरात मोर्चा काढत “नुसत्या घोषणा आणि जाहिराती कधी होणार पद भरती” “सरकार देतय आश्वासने खोटी, प्रत्येक परीक्षेत पेपरफुटी” अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. (Winter Session)

याप्रसंगी विरोधकांनी पायऱ्यांवर वडे तळत बेरोजगारांची थट्टा करणाऱ्या सरकारविरोधात ‘बेरोजगारी वाढली, काय दिवे लावले, भरतीची घोषणा, काय दिवे लावले. उच्चशिक्षित तरुणांची थट्टा करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, बेरोजगारांना पकोडे तळा म्हणणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे, अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली. (Winter Session)

(हेही वाचा – Thane Power Block : ‘या’ स्थानकावर दोन दिवस वाहतूक आणि पॉवर ब्लॉक)

घोषणांनी दुमदुमला परिसर 

“एक दिवा खोक्यानी दुसरा दिवा धोक्यानी” नुसत्या घोषणा आणि जाहिराती कधी होणार पद भरती” सरकार देतय आश्वासने खोटी, प्रत्येक परीक्षेत पेपरफुटी “का होतेय पेपरफुटी क्या यही है मोदी की गॅरंटी?” सरकारनं दिला युवकांना धोका म्हणून काढलाय भरतीचा ठेका” अशा विविध घोषणा लिहिलेले काळे फलक घेत जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी परिसर दणाणून सोडला. (Winter Session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.