Modi Cabinet Expansion : हिवाळी अधिवेशनानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा होणार विस्तार; ‘या’ नावांची चर्चा

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर २०२४ मधील लोकसभेची निवडणूक डोळ्यापुढे ठेवूनच नेत्यांना संधी दिली जाणार आहे.

234
Modi Cabinet Expansion : हिवाळी अधिवेशनानंतर मोदी मंत्रिमंडळाचा होणार विस्तार; 'या' नावांची चर्चा
Modi Cabinet Expansion : हिवाळी अधिवेशनानंतर मोदी मंत्रिमंडळाचा होणार विस्तार; 'या' नावांची चर्चा
  • वंदना बर्वे

संसदेचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. यात मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्यासह महाराष्ट्रातून खासदार राहुल शेवाळे आणि प्रफुल्ल पटेल यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. चौहान यांना कृषी मंत्रालयाचा पदभार सोपविला जाणार असल्याची चर्चा आहे. (Modi Cabinet Expansion)

भाजपशासित राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला आहे. आता संसदेचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) संपल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा संसदेच्या आवारात सुरू झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांची निवड मध्यप्रदेश विधानसभेच्या अध्यक्षपदी झाली आहे. यामुळे मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना कृषी मंत्रालयाची जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. (Modi Cabinet Expansion)

महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार खूप दिवसांपासून प्रलंबित आहे. आता संसदेचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तार होऊ शकतो असे समजते. भारतीय जनता पक्षाने (Bharatiya Janata Party) २०२४ मधील लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Election) डोळ्यापुढे ठेवून राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत (Lok Sabha Election) जास्तीत जास्त मतदारांना आकर्षित करणे हा त्यामागचा हेतू आहे. (Modi Cabinet Expansion)

(हेही वाचा – RBI ने केली महाराष्ट्रातील ‘या’ पाच बँकांवर कारवाई; जाणून घ्या कारण)

तरूण, तडफदार आणि तेजतर्रार खासदारांना मंत्रिमंडळात स्थान

अशात, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर २०२४ मधील लोकसभेची निवडणूक डोळ्यापुढे ठेवूनच नेत्यांना संधी दिली जाणार आहे. यात अनेकांची खुर्ची जाण्याची शक्यता आहे तर अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. या विस्तारात निवडणुका लक्षात घेता तरूण, तडफदार आणि तेजतर्रार खासदारांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार असल्याचे समजते. निवडणुकीमुळे भाजप संघटना सुध्दा बळकट करायची आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारात ज्यांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे त्यात मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान आणि माजी केंद्रीय मंत्री स्व. रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान यांचा समावेश आहे. याशिवाय, महाराष्ट्रातून दोन नेत्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. (Modi Cabinet Expansion)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील शिवसेनेतून दोन आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेला (Shiv Sena) एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळू शकते. लोकसभेतील शिवसेनेचे नेते आणि दक्षिण मुंबईचे खासदार राहुल शेवाळे आणि बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील ज्या नेत्याचे नाव चर्चेत आहे ते म्हणजे माजी नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांचे. (Modi Cabinet Expansion)

(हेही वाचा – MLA disqualification Case: आमदार अपात्रता प्रकरणी १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून विधानसभा अध्यक्षांना दिलासा)

मोठ्या नावांचा मोदी मंत्रिमंडळात समावेश

भाजपने अनेक खासदारांचा राजीनामा घेतला आहे. यात नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद पटेल, रेणुका सिंह आणि दियाकुमारी यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. तोमर विधानसभेचे अध्यक्ष होणार आहेत तर दियाकुमारी यांनी राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदाची आजच शपथ घेतली आहे. अशात मंत्रिमंडळ विस्ताराची प्रक्रिया सुरू होऊ शकते, असे मानले जात आहे. अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मंत्रिमंडळात कोणत्या राज्याचा विचार करून मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Modi Cabinet Expansion)

राजकीय विश्लेषकानुसार, पंजाब, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र किंवा दक्षिण भारतातील काही मोठ्या नावांचा मोदी मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो. कॅबिनेट मंत्री भूपेंद्र यादव यांचे खाते बदलले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते. उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांच्याही नावाची चर्चा आहे. (Modi Cabinet Expansion)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.