शिर्डी येथील साईबाबा मंदिरात ‘दर्शन पास’ (Darshan Pass) देण्याबाबत अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कडक धोरण अलंबण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाने दिली आहे. पासेसची खात्री करूनच मंदिरात प्रवेश द्यावा. ज्या भाविकांना दर्शन घ्यायचे आहे त्यांची नावे सांगून आणि पास कोणी विकत घेतला आहे, त्याची ऑनलाईन नोंद ठेवावी. दर्शन पास फक्त त्यांनाच दिला जाईल, याची काळजी घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे.
कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी शिर्डी येथील साईबाबा मंदिर आणि परिसराची सुरक्षा व्यवस्था केंद्रीय राखीव बल किंवा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल यांच्यामार्फत करण्यात यावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली.
(हेही वाचा – Drug Case : १६ वर्षांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुन्हा तुरुंगात)
याबाबत काही माजी विश्वस्तांनी दुपारच्या आरतीसाठी पास मिळवून ते बाहेर प्रिमियम दराने विकल्याबद्दलच्या अहवालाप्रमाणे उच्च न्यायालयाने अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पास देण्याबाबत कडक धोरण अवलंबण्याची परवानगी दिली तसेच दर्शनार्थींकडे पास असल्याची खात्री करावी आणि त्यानंतरच मंदिरात प्रवेश द्यावा, असेही सांगितले.
हेही पहा –