भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर (M S Dhoni) फिक्सिंगचे आरोप करणे महागात पडले आहे. मद्रास उच्च न्यायालयाने त्या अधिकाऱ्याला १५ दिवसांची शिक्षा सुनावली आहे. जाणून घ्या पूर्ण प्रकार.
महेंद्र सिंग धोनीने (M S Dhoni) दाखल केलेल्या अवमान याचिकेवर निवृत्त आयपीएस अधिकारी जी संपत कुमार यांना मद्रास उच्च न्यायालयाने आज म्हणजेच शुक्रवार१५ डिसेंबर रोजी पंधरा दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
(हेही वाचा – Drug Case : १६ वर्षांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुन्हा तुरुंगात)
न्यायमूर्ती एसएस सुंदर आणि न्यायमूर्ती सुंदर मोहन यांच्या खंडपीठाने (M S Dhoni) ही शिक्षा सुनावली आहे. या निर्णयाविरुद्ध अपील करण्यासाठी न्यायालयाने संपत कुमार यांना ३० दिवसांचा वेळ दिला आहे.
नेमका प्रकार काय ?
संपत कुमार यांनी २०१४ मध्ये आयपीएल फिक्सिंग प्रकरणात महेंद्र सिंग धोनीवर (M S Dhoni) आरोप केले होते. त्यांतर धोनीने त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकून १०० कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली होती. तसेच संपत कुमार यांनी माननीय न्यायालयाच्या विरोधात केलेल्या अवमानकारक व्यक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करावी, अशीही मागणी धोनीने आपल्या याचिकेतून केली होती.
(हेही वाचा – Modi Cabinet Expansion : हिवाळी अधिवेशनानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा होणार विस्तार; ‘या’ नावांची चर्चा)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संतप कुमार यांनी न्यायमूर्ती मुद्गल समितीच्या अहवालातील काही भाग सुप्रीम कोर्टाने सील बंद पाकिटात ठेवला आणि त्या मजकूराला एसआयटीच्या हाती दिले नाही, असा आरोप केला होता. (M S Dhoni)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community