संसदेत बुधवारी, १३ डिसेंबरला झालेल्या घुसखोरी प्रकरणात (Parliament Intrusion) नवनवीन खुलासे उघडकीस येत आहेत. या प्रकरणाचा मास्टरमाइंड ललित झा याला पोलिसांनी ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ललितने पोलिसांना दिलेली माहिती अशी की, त्यांचा मुख्य घुसखोरीचा प्लॅन फसला. त्याच्याकडे प्लॅन बी होता. काही कारणास्तव ए नुसार, नीलम आणि अमोल यांना संसद भवनाजवळ जायचं होतं, जर ते त्या अयशस्वी झाले तर महेश आणि कैलाश दुसऱ्या बाजूने संसदेकडे जातील आणि नंतर संसदेसमोर स्मोक क्रॅकर्सचा वापर करत घोषणाबाजी करतील.
(हेही वाचा – Parliament Security: संसदेचे कामकाज सुरू असताना सुरक्षा भंग प्रकरणाऱ्या मास्टरमाइंडला पोलीस कोठडी )
महेश आणि कैलाश गुरुग्राममध्ये विशाल ऊर्फ विक्कीच्या घरी पोहोचू शकले नाहीत, जिथे संपूर्ण ग्रुप राहात होता. त्यामुळे अमोल आणि नीलम यांना संसदेबाहेर काय करायचं आहे, यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या होत्या. २००१च्या संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वर्धापनदिनाच्या दिवशीच सागर शर्मा आणि मनोरंजन डी यांनी गॅलरीतून लोकसभेच्या सभागृहात उडी मारली. स्मोक कँडल जाळल्या, घोषणाबाजी केली. नंतर त्यांना पकडण्यात आलं.
खासदार आणि सुरक्षा दलांनी त्यांना पकडलं तेव्हा अमोल आणि नीलम संसदेबाहेर घोषणाबाजी करत होते. अशा प्रकारे त्यांनी प्लॅन A यशस्वी केला. या योजनेनुसार, ललितला राजस्थानमध्ये अज्ञातवासात जाण्यास मदत करण्याची जबाबदारी महेशवर देण्यात आली होती. महेशने त्याचे ओळखपत्र वापरून ललितची गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची व्यवस्था केली. ललित, महेश यांनी गुरुवारी रात्री पोलीस ठाणे गाठून शरणागती पत्करली. या प्रकरणात आतापर्यंत सागर शर्मा, मनोरंजन डी, नीलम आझाद, विकी आणि विकीची पत्नी, महेश, कैलाश, ललित झा आणि अमोल शर्मा अशा ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती इंडिया टुडे वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community