मुंबई इंडियन्सने शुक्रवारी, १५ डिसेंबरला महत्त्वाची घोषणा केली आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya:) मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारणार आहे. सर्वात यशस्वी आणि आवडत्या कर्णधारांपैकी एक असलेल्या रोहित शर्माच्या जागी तो कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे.
View this post on Instagram
मुंबई इंडियन्सच्या ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मन्स (जागतिक कामगिरीचे प्रमुख) महेला जयवर्धने यांनी या बदलावर भाष्य करताना सांगितले की, “हा वारसा उभारणीचा एक भाग आहे आणि भविष्यासाठी तयार राहण्याच्या मुंबई इंडियन्सच्या तत्त्वज्ञानाचे पालन करत आहे. सचिनपासून ते हरभजन आणि रिकीपासून ते रोहितपर्यंत मुंबई इंडियन्सला नेहमीच अपवादात्मक नेतृत्व लाभले आहे, ज्यांनी तात्काळ यशात योगदान देतानाच भविष्यासाठी संघाला बळकट करण्यावर नेहमीच लक्ष ठेवले आहे. यानुसार, हार्दिक पांड्या आयपीएल 2024च्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारेल.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक म्हणून त्याचे स्थान मजबूत केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, एम. आय. हा आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी आणि आवडत्या संघांपैकी एक बनला. मुंबई इंडियन्सला आणखी बळकट करण्यासाठी आम्ही मैदानावर आणि मैदानाबाहेर त्याच्या मार्गदर्शनाची आणि अनुभवाची अपेक्षा करू. मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार म्हणून आम्ही हार्दिक पांड्याचे स्वागत करतो आणि त्याला शुभेच्छा देतो, अशा भावना महेला जयवर्धने यांनी व्यक्त केल्या.
हेही पहा –