आर्थर सी. क्लार्क (Arthur C. Clarke) हे जागतिक कीर्तीचे एक विज्ञान लेखक होते. त्यांचा जन्म १६ डिसेम्बर १९१७ रोजी इंग्लंड येथे झाला. उपग्रहाद्वारे संज्ञापनांची संकल्पना सर्वांत आधी आर्थर सी. क्लार्क यांनी मांडली होती. अवकाश आणि विज्ञान या विषयावर त्यांनी जवळजवळ १०० हून अधिक पुस्तकांचे लिखाण केले आहे.
युनेस्कोद्वारे कलिंग पुरस्कार
क्लार्क यांनी १९६८ मध्ये २००१: अ स्पेस ऑडिसी (2001: A Space Odyssey) नावाच्या चित्रपटासाठी सह-पटकथा लेखन केले आहे. क्लार्क हे एक विज्ञानकथा लेखक होते. लोकप्रिय मासिकांसाठी त्यांनी अनेक पुस्तके आणि अनेक निबंध लिहिले. १९६१ मध्ये त्यांना विज्ञानाचा प्रचार करण्यासाठी युनेस्कोद्वारे कलिंग पुरस्कार मिळाला होता.
क्लार्क यांनी वैज्ञानिक जगतात मुक्तपणे विहार केला आणि आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर त्यांनी प्रचंड मोठे काम करुन ठेवले आहे. म्हणूनच त्यांना “Prophet of the Space Age” असे म्हटले जाते. त्यांना Hugo आणि Nebula पुरस्कार मिळाला आहे. ते प्रचंड लोकप्रिय होते आणि त्यांची वाचक संख्या वाखाणण्याजोगी होती.
(हेही वाचा – Payment Gateway Scam : पेमेंट गेटवे घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा)
विज्ञानकथेतील “बिग थ्री”
आर्थर क्लार्क, रॉबर्ट हेनलिन आणि आयझॅक असिमोव्ह या तिघांना विज्ञानकथेतील “बिग थ्री” म्हणून ओळखले जाते. किशोरवयाचे असतानाच १९३४ मध्ये त्यांनी BIS, British Interplanetary Society मध्ये प्रवेश घेतला आणि विशेष म्हणजे १९४६ ते १९४७ तसेच १९५१ ते १९५३ मध्ये ते BIS, British Interplanetary Society चे अध्यक्ष झाले.
त्यांनी क्लार्कने १९८० च्या दशकात आर्थर सी. क्लार्क्स मिस्टीरियस वर्ल्ड (Arthur C. Clarke’s Mysterious World) हा टेलिव्हिजन शो होस्ट केला. १९ मार्च १९८० मध्ये त्यांचे निधन झाले. त्यावेळी ते श्रीलंकेत होते. आपल्या आयुष्याची काही वर्षे त्यांनी आपल्या शेजारच्या देशात, श्रीलंकेत घालवली. (Arthur C. Clarke)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community