संसदेचे कामकाज सुरू (Parliament Security) असतानाच दोन तरुणांनी घुसघोरी केली. यावेळी त्यांनी संसद परिसरात धुराच्या नळकांड्या फोडल्या तसेच निदर्शने करून घोषणाबाजीही केली. या प्रकरणाचा मास्टर माइंड ललित झा पोलिसांना शरण आला आहे.
बुधवारी, १३ डिसेंबरला संसदेच्या लोकसभा सभागृहात कामकाज सुरू असताना घुसखोरी करण्याचा प्लान करणाऱ्या ललित झा याला दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने ललित झा याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
(हेही वाचा – Beed Fire Case : बीड जाळपोळ प्रकरणी एसआयटी नेमणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती)
संसदेतील सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ४ जणांवर दहशतवादविरोधी कायदा (यूएपीए) व्यतिरिक्त भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी संसदेत पोहोचण्यापूर्वी गुरुग्राममध्ये विशाल शर्मा ऊर्फ विकीच्या घरी थांबले होते.
सागर शर्मा, मनोरंजन डी, अमोल शिंदे आणि नीलम देवी या चारही आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या घटनेनंतर फरार झालेला ललित झाने स्वत:हून दिल्लीतील कर्तव्य पथ पोलीस स्थानकात गुरुवारी आत्मसमर्पण केले. यानंतर आज त्याला न्यायालयासमोर हजर केले असताना न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.
#WATCH | Parliament security breach accused Lalit Jha being brought out of Patiala House Court, in Delhi.
Join Our WhatsApp CommunityHe has been sent to a 7-day Police remand. pic.twitter.com/aLGqzuuGoM
— ANI (@ANI) December 15, 2023