Dadar Swimming Pool : दादरच्या जलतरण तलावातील पंपात वारंवारचा बिघाड

दादरमधील महात्मा गांधी ऑलिम्पिक जलतरण तलावातील जलशुध्दीकरणासाठी वापरले जाणारे पंप हे वारंवार बंद पडत असून या वारंवारच्या तांत्रिक बिघाडांमुळे जलतरण तलाव बंद ठेवण्याची वेळ येत आहे.

1814
Dadar Swimming Pool : दादरच्या जलतरण तलावातील पंपात वारंवारचा बिघाड
Dadar Swimming Pool : दादरच्या जलतरण तलावातील पंपात वारंवारचा बिघाड

दादरमधील महात्मा गांधी ऑलिम्पिक जलतरण तलावातील जलशुध्दीकरणासाठी वापरले जाणारे पंप हे वारंवार बंद पडत असून या वारंवारच्या तांत्रिक बिघाडांमुळे जलतरण तलाव बंद ठेवण्याची वेळ येत आहे. याठिकाणी पंधरा वर्षांपूर्वी हे पंप बसवण्यात आले होते. परंतु या पंपाचे आयुर्मान संपुष्टात आल्याने या बंद पडलेल्या पंपांची तात्पुरती दुरुस्ती करून पुन्हा पंप सुरु करत जलतरण तलावाची सेवा सुरळीत राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. (Dadar Swimming Pool)

जलतरण तलावांमध्ये ‘इतक्या’ लिटर पाण्याचा वापर

दादर पश्चिम येथील महात्मा गांधी स्मारक ऑलिम्पिंक जलतरण तलावामध्ये पाणी गाळण्यासाठी जल शुध्दीकरण यंत्रणा बसवण्यात आली आहे. या जलतरण तलावांमध्ये दीड लाख लिटर पाण्याचा वापर केला केला जातो. या पाण्यावरील शुध्दीकरणाच्या यंत्रणेसोबत २५ अश्वशक्ती क्षमतेचे चार पंप बसवण्यात आले आहे. परंतु यापैंकी दोन पंप बंद असून केवळ दोन पंपाच्या आधारे जलशुध्दीकरणाची प्रक्रिया केली जात आहे. त्यामुळे हे तरण तलाव अनेकदा बंद ठेवण्याची वेळ महापालिकेवर येत आहे. (Dadar Swimming Pool)

(हेही वाचा – Beed Fire Case : बीड जाळपोळ प्रकरणी एसआयटी नेमणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती)

ऑनलाईन पध्दतीने सभासद नोंदणी

महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या हे १५ वर्षांपूर्वी बसवण्यात आले असून हे पंप जुने तसेच कालबाह्य झालेले आहे. या पंपाचे आयुर्मान संपुष्टात आल्याने यात सातत्याने बिघाड होत आहे. सध्या तरण तलाव दोन पंपाच्या आधारे पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे जलतरण तलावाला आवश्यक असणारा पाणी पुरवठा केला जात नाही. परिणामी जलतरण तलाव बंद ठेवावे लागते ही वस्तूस्थिती असल्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे या जुन्या पंपांच्या जागी नवीन पंप बसण्याचा निर्णय घेतला असून याबाबत निविदा स्तरावर कार्यवाही सुरु असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दादर जलतरण तलावामध्ये सुमारे ७०० वार्षिक सभासद आणि ८२५ त्रैमासिक सभासद असून सध्या या तरण तलावामध्ये ऑनलाईन पध्दतीने सभासद नोंदणी केली जात आहे. (Dadar Swimming Pool)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.