Mysore Airport Renamed : विमानतळाला टीपू सुलतानाचे नाव देण्याच्या काँग्रेसच्या प्रस्तावावरून भाजप आक्रमक

कर्नाटकात टीपू सुलतानाच्या नावाचा वाद हा काही नवीन नाही. याच मुद्द्यावरून भाजपने विधानसभा निवडणुकीचा प्रचार केला. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी टीपू सुलतानाची वाहवा करणारे लोक तुम्हाला हवे आहेत का असा प्रश्न विचारला होता.

285
Mysore Airport Renamed : विमानतळाला टीपू सुलतानाचे नाव देण्याच्या काँग्रेसच्या प्रस्तावावरून भाजप आक्रमक

कर्नाटकात पुन्हा एकदा टीपू सुलतानच्या (Mysore Airport Renamed) नावावरून काँग्रेस आणि भाजप यांच्यात वाद सुरु झाला आहे. म्हैसूर विमानतळाचे नाव टिपू सुलतान या अत्याचारी मुस्लिम शासकाच्या नावावर ठेवण्याच्या काँग्रेस आमदार प्रसाद अब्बय्या यांच्या सूचनेला कर्नाटक विधानसभेत भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

नेमका प्रकार काय ?

विमानतळाची नावे बदलण्याबाबत राज्य सरकारने केंद्र सरकारशी (Mysore Airport Renamed) केलेल्या संभाषणादरम्यान, हुबळी-धारवाड (पूर्व) चे आमदार अब्बय्या यांनी एक प्रस्ताव मांडला. अब्बय्या यांनी सुचवले, “आपण म्हैसूर विमानतळाचे नाव बदलून टीपू सुलतान विमानतळ करण्याचा विचार केला पाहिजे”.

(हेही वाचा – Dheeraj Sahu : ‘तो मी नव्हेच…’; आयकर विभागाच्या छापेमारीनंतर धीरज साहू यांनी दिली पहिली प्रतिक्रिया)

अब्बय्या यांच्या या प्रस्तावावर भाजपाचे आमदार संतप्त झाले, (Mysore Airport Renamed) आणि काँग्रेसच्या या निर्णयाला विरोध झाला. तथापि, कर्नाटक विधानसभेने गुरुवारी (१४ डिसेंबर) एकमताने एक ठराव मंजूर केला आणि केंद्र सरकारला प्रतिष्ठित व्यक्तींच्या सन्मानार्थ चार विमानतळांचे नामकरण करण्याची विनंती केली.

‘या’ विमानतळांची नावं बदलणार

हुबळी विमानतळाचे नाव क्रांतीवीर संगोली रायण्णा, बेळगाव विमानतळाचे (Mysore Airport Renamed) नाव कित्तूर राणी चेन्नम्मा, शिवमोगा विमानतळाचे नाव राष्ट्रकवी डॉ. के. व्ही. पुट्टप्पा (कुवेम्पू) यांच्या सन्मानार्थ आणि विजयपुरा विमानतळाचे नाव श्री जगद्ज्योति बसवेश्वर यांच्या नावावरून करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – Lokayukta Bill : लोकायुक्त विधेयक विधानपरिषदेत एकमताने मंजूर)

सिद्धरामय्या आणि टीपू सुलतान

यापूर्वी, १३ ऑक्टोबर रोजी, एका कार्यक्रमाला संबोधित करताना, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले की कित्तूर राणी चन्नम्मा आणि टीपू सुलतान हे आत्मसन्मानाच्या लढाईसाठी प्रेरणा म्हणून काम करतात. (Mysore Airport Renamed)

तसेच २०१६ मध्ये, जेव्हा सिद्धरामय्या यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून काम केले, तेव्हा त्यांनी वादग्रस्त व्यक्ती टीपू सुलतानची जयंती (Mysore Airport Renamed) करण्याचा निर्णय घेतला. मात्र २०१९ मध्ये राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांचा हा ठराव रद्द करण्यात आला.

(हेही वाचा – Sugar cane Juice : ‘इतक्या टनापर्यंत ‘ इथेनॉल निर्मितीस केंद्राची परवानगी; शेतकऱ्यांना दिलासा)

कर्नाटकात टीपू सुलतानाच्या नावाचा वाद हा काही नवीन नाही. याच मुद्द्यावरून भाजपने विधानसभा निवडणुकीचा प्रचार केला. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी टीपू सुलतानाची वाहवा करणारे लोक तुम्हाला हवे आहेत का असा प्रश्न विचारला होता. (Mysore Airport Renamed)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.