- ऋजुता लुकतुके
पुणे इथं झालेल्या टेस्ट ड्राईव्हमध्ये ही स्कूटर प्रतीतास १०० किमीचा वेग आरामात गाठत होती
नवीन वर्षी ज्या स्कूटरची लोक उत्सुकतेनं वाट पाहत आहेत अशी एक स्कूटर आहे जॉयमॅक्स झेड ३००. कारण, भारतातील ही पहिली मॅक्सी स्कूटर असावी. आणि टेस्ट ड्राईव्हमध्ये या स्कूटरने खूपच चांगली कामगिरी केली आहे. २७८ सीसी इंजिन असलेली ही स्कूटर २०.३ पीएस इतकी शक्ती निर्माण करते. आणि तिचा टॉर्क आहे २७.३ एनएम.
पुण्यात अलीकडेच झालेल्या टेस्ट ड्राईव्ह दरम्यान ही स्कूटर गर्दीच्या रस्त्यांवरही १०० किमीचा वेग गाठताना दिसत होती. त्यामुळे हेच या स्कूटरचं वैशिष्ट्य असणार आहे. आणि स्कूटर प्रकारातील असली तरी ती तरुणाईला आकर्षित करणारी आणि स्पोर्टी लूक असलेली असेल हे स्पष्टच आहे. या स्कूटरला मोठं विंडशिल्ड आहे. आणि तिची सीटही मोठी आहे. स्कूटरच्या सीटखाली असलेली स्टोरेज जागा दोन हेलमेटना सामावून घेऊ शकेल इतकी मोठी आहे. शिवाय यात युएसबी चार्जरचीही सोय आहे.
(हेही वाचा – Hasan Mushrif : राज्यातील शासकीय रुग्णालयांत पुरेसा औषधसाठा)
मूळ इटालीयन कंपनी असलेल्या एसवायएम मोटर्सनी इटालीयन ट्विटर हँडलवर या स्कूटरचा एक व्हीडिओ गेल्यावर्षी शेअर केला होता. त्यातून ही स्कूटर चालवण्याचा अनुभव आपल्याला समजू शकतो.
#sym #joyride 16 300: ruota da 16″, pedana piatta, parabrezza regolabile, fari full-led, keyless. Spazioso: Portapacchi integrato e vano sottosella al top per capacità di carico. Qualità: garanzia 4anni+4 anni di assistenza stradale gestita da App #MySym .https://t.co/MvpXc5cQGA pic.twitter.com/4Oh63fysBx
— Sym Italia (@SymItalia) November 29, 2022
भारतात या स्कूटरचं मार्केटिंग करण्यासाठी एसवायएम कंपनी महिंद्रा किंवा कायनेटिक ऑटोरोयाल या कंपन्यांशी सहकार्य करार करू शकते. ही स्कूटर म्हणजे कंपनीचा भारतात पुन्हा प्रवेश करण्याचा प्रयत्न आहे. या प्रिमिअम स्कूटरची स्पर्धा होंडाच्या येऊ घातलेल्या होंडा फोर्झा ३५० या स्कूटरशी असेल. तर जॉयमॅक्स झेड ३०० ची संभाव्य किंमत आहे ३,२५,००० रुपये फक्त.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community