Singapore Coronavirus : कोरोना महामारीचं संकट कायम? सिंगापूरमध्ये आढळले ५६ हजार रुग्ण

सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवड्यात देशात कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये ७५ टक्के वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने १९ डिसेंबरपासून दररोज कोरोना अपडेट जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

309
Singapore Coronavirus : कोरोना महामारीचं संकट कायम? सिंगापूरमध्ये आढळले ५६ हजार रुग्ण

देशात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. अशातच सिंगापूरमध्ये (Singapore Coronavirus) ५६ हजार कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळेच कोरोना महामारीचं संकट पुन्हा येणार का अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवड्यात देशात कोरोना विषाणूच्या (Singapore Coronavirus) प्रकरणांमध्ये ७५ टक्के वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने १९ डिसेंबरपासून दररोज कोरोना अपडेट जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा – Accident : नागपुरात भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू)

मास्क वापरण्याची सक्ती

याच पार्श्वभूमीवर सिंगापूर सरकारने लोकांना गर्दीच्या (Singapore Coronavirus) ठिकाणी मास्क वापरण्याची सक्ती केली आहे. ज्यांना त्रास होत नाही अशा नागरिकांनी देखील मास्क वापरणं सक्तीचं झालं आहे. विशेषतः वृद्धांसोबत राहणाऱ्या लोकांना घरातही मास्क घालण्यास सांगण्यात आले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सिंगापूरमध्ये कोरोना संसर्गामुळे (Singapore Coronavirus) रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या दररोज सरासरी २२५-३३५० इतकी आहे. तर आयसीयूमध्ये दररोज सरासरी ४ ते ९ रुग्ण दाखल होतात. बहुतेक संक्रमित रुग्ण कोरोना विषाणूच्या जे. एन. 1 या प्रकाराने संक्रमित असल्याचे आढळून आले आहे.

(हेही वाचा – SYM Joymax Z 300 : भारतातील या पहिल्या मॅक्सी स्कूटरची किंमत माहीत आहे?)

भारतातही कोरोना महामारीचे संकट

भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत आहे. मात्र, सध्या काळजी करण्यासारखे काही नाही. शुक्रवारी (१५ डिसेंबर) देशात कोरोना विषाणूची ३१२ नवीन प्रकरणे नोंदवली गेली, त्यापैकी २८० केवळ केरळमधील आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात १७६०५कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.