Aadhaar Card Update : आधारसाठी अतिरिक्त शुल्क आकरल्यास लागणार ५० हजाराचा दंड

आधिक शुक्ल घेतल्यास दोषी सिद्ध झालेल्या ऑपरेटर्सना निलंबित करण्याची कारवाई केली जाऊ शकते.

232
Aadhaar Update : आधार कार्डमध्ये मोफत बदल करण्यासाठी उरले फक्त ६ दिवस

आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठीची तारीख सध्या वाढवली आहे. आपले आधार अपडेट करण्यासाठी लोकांची एकच गर्दी होत आहे. यात जर कोणी अतिरिक्त शुल्काची विचारणा केल्यास त्यांच्यासाठी सरकारने दंड आकारला जाईल असे सांगितले आहे. नियमापेक्षा आधिक शुल्क घेणाऱ्या सेवा केंद्रास ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. अशी घोषणा केंद्र सरकारने लोकसभेत केली आहे. आधार कार्ड बाबत सेवांची पूर्तता करताना केंद्रचालक नागरिकांकडून अवाजवी शुल्क घेत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. याच अनुषंगाने सरकारने ही माहिती दिली आहे. (Aadhaar Card Update )

आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर (Rajiv Chandrashekhar) यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, आधार सेवा केंद्रांना ‘युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी (UIDAI) कडून परवाने देण्यात येतात. आधिक शुक्ल घेतलेल्या दोषी सिद्ध झालेल्या ऑपरेटर्सना निलंबित करण्याची कारवाई केली जाऊ शकते. (Aadhaar Card Update)

(हेही वाचा :Singapore Coronavirus : कोरोना महामारीचं संकट कायम? सिंगापूरमध्ये आढळले ५६ हजार रुग्ण)

सरकारकडून आधार अपडेट करण्यासंदर्भात नागरिकांना वेळोवेळी सूचना देतात. राज्यमंत्री चंद्रशेखर यांनी सांगितले  की आधार सेवा केंद्रावर बायोमेट्रिक आणि डेमोग्राफीक माहिती अद्ययावत करण्याची सेवा दिली जाते. त्यासाठी जास्तीचे शुल्क घेतले गेल्यास नागरिक टोल फ्री क्रमांक १९४७ वर आपली तक्रार नोंदवू शकतात. याशिवाय यूआयडीएआयला एक ईमेल पाठवू शकतात.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.